मृत घोषित केलेला व्यक्ती अचानक घ्यायला लागला श्वास; डॉक्टर चक्रावले
मृत घोषित केलेला व्यक्ती अचानक घ्यायला लागला श्वास; डॉक्टर चक्रावलेSaam TV

मृत घोषित केलेला व्यक्ती अचानक घ्यायला लागला श्वास; डॉक्टर चक्रावले

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एक अजक घटना घडली आहे. रस्ते अपघातात एका व्यकीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मुरादाबाद : उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एक अजक घटना घडली आहे. रस्ते अपघातात एका व्यकीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पंचनाम्यासाठी पोलीस जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मृताच्या अंगावरच्या जखमा पाहिल्या आणि तो जिवंत असल्याचे कळाले. मृत व्यक्ती जिवंत असल्याचे कळताच दुखा:त बुडालेल्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर अचानक आनंद आला. डॉक्टरांनी त्वरीत व्यक्तीली तपासलं आणि लगेच जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु केले. त्याआधी पहाटे साडे चार वाजता त्याच व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यानंतर व्यक्तीचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला.

मृत घोषित केलेला व्यक्ती अचानक घ्यायला लागला श्वास; डॉक्टर चक्रावले
सोशल मीडियावरील मैत्रीचा शेवट बलात्काराने; नागपूरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

शुक्रवारी सकाळी रुग्णालयातील शवागारात एकच खळबळ उडाली. सात तास शवागारात ठेवलेल्या व्यक्तीचा श्वास अचानक सुरु झाल्याने रुग्णालयातील सर्वजण चक्रावले. अचानक जिवंत झालेल्या व्यक्तीचे नाव श्रिकेश आहे. ते नगरपरिषदेचे कर्मचारी आहेत. काल रात्री ते दुध आणण्यासाठी ते घराबाहेर पडले आणि त्यांचा अपघात झाला. यानंतर त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्वरीत श्रीकेश यांना रुग्णालयात नेले, तीन रुग्णालयात नेले परंतु तिन्ही रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात केले.

तीन रुग्णालयात मृत घोषित केल्यानं श्रीकेश यांचे नातेवाईक मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर आपत्कालीन विभागातील डॉक्टरनेही त्यांना मृत घोषित केले. शुक्रवारी सकाळी पोलिस पंचनाम्याची तयारी करत होते तेव्हा त्यांना मृताच्या श्वास घेण्याचा आवाज आला, तेव्हा पोलिसांना कळाले की व्यक्ती जिवंत आहे. आणि त्यानंतर परत त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com