धक्कादायक! होणाऱ्या पत्नीच्या आत्महत्येचा तपास सुरु असतानाच जवानाने केली आत्महत्या
धक्कादायक! होणाऱ्या पत्नीच्या आत्महत्येचा तपास सुरु असतानाच जवानाने केली आत्महत्याSaam Tv

धक्कादायक! होणाऱ्या पत्नीच्या आत्महत्येचा तपास सुरु असतानाच जवानाने केली आत्महत्या

पप्पू लाल यादव हे कुमाऊँ रेजिमेंटमध्ये होते.

राजस्थान : राजस्थानच्या (Rajsthan) कोटा जिल्ह्यात 24 वर्षीय जवान (Soldier) पप्पू लाल यादव यांचे चित्तौडगड जिल्ह्यातील मुलीशी त्याचे लग्न ठरले होते त्याची ती भावी पत्नी होती. मात्र या मुलीने लग्नाआधीच आत्महत्या केली आणि या आत्महत्येमुळे (Suicide) तणावात आलेल्या जवानाने देखील आपलं आयुष्य संपवल आहे.The soldier committed suicide

हे देखील पहा-

होणाऱ्या पत्नीच्या आत्महत्येनंतर तणावात येऊन दोन दिवसांनी सैनिकाने हे पाऊल उचलले असल्याचे कोटा ग्रामीणमधील चेचट पोलीस स्टेशनचे स्टेशन प्रभारींनी सांगितलं. पप्पू लाल यादव हे कुमाऊँ रेजिमेंटमध्ये (Kumaon Regiment) होते आणि ते डेहराडूनमध्ये तैनात होते. दरम्यान आज सकाळी सहाच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जवानाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार पप्पूच्या भावी पत्नीने चित्तौडगड जिल्ह्यात आत्महत्या केल्यामुळे निराश होता तो खूप निराश होता. तर पोलिसांनी सांगितले सैनिकाने आत्महत्या करण्यापुर्वी आपल्या भावी पत्नीचे स्टेटस अपडेट केले होते, शिवाय या स्टेटस मध्ये 'तुम नही,तो मैं नहीं' असही लिहलं होतं.

धक्कादायक! होणाऱ्या पत्नीच्या आत्महत्येचा तपास सुरु असतानाच जवानाने केली आत्महत्या
तालिबानच्या दहशतीला न जुमानता अफगाणी नागरिकांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन

लग्न ठरलेली मुलगी ही चित्तौडगड जिल्ह्यातील होतीशिवाय ती बेसिक स्कूल ट्रेनिंग कोर्स च्या द्वितीय वर्षाचे शिक्षण गेत होती. दोघांचे लग्न दिवाळीनंतर होणार होते. मात्र त्या आधीच 4 सप्टेंबर रोजी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण काय याचा तपास सुरु असतानाच तणावाखाली येऊन जवानाने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र या गडलेल्या धक्कादायक घटनेमुळे सवत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com