Accident: भरधाव वेगातील चारचाकीने रस्त्यावरील नागरिकांना चिरडले (पहा व्हिडिओ)

एका भरधाव ऑडी कारने अनेकांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली
Accident: भरधाव वेगातील चारचाकीने रस्त्यावरील नागरिकांना चिरडले (पहा व्हिडिओ)
Accident: भरधाव वेगातील चारचाकीने रस्त्यावरील नागरिकांना चिरडले (पहा व्हिडिओ)Saam Tv

वृत्तसंस्था : एका भरधाव ऑडी कारने अनेकांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. या अपघाताचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या अपघातमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर ९ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी २ प्रकृती अधिकच गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

हा अपघात राजस्थान मधील जोधपूर Jodhpur या ठिकाणी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भरधाव ऑडी कारने नागरिकांना चिरडले आहे, ती गाडी राजस्थान मधील जयपूर या ठिकाणी रजिस्ट्रेशनची असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताचा व्हिडीओ बघून अक्षरशः अंगावर काटा येत आहे. अपघाताचा सीसीटीव्ही बघून अपघात किती भीषण होता, याचा अंदाज वर्तवला जाऊ लागला आहे.

हे देखील पहा-

मंगळवारी सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. राजस्थान मधील जोधपूर या ठिकाणी मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जोधपूर शहरात असलेल्या एम्स रोडवर हा अपघात झाला आहे. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे की, भरधाव ऑडी कारने रस्त्यावर असलेल्या नागरिकांना चिरडत तसेच अनेक दुचाकी वाहनचालकांना जोरदार धडक देत गेली आहे.

Accident: भरधाव वेगातील चारचाकीने रस्त्यावरील नागरिकांना चिरडले (पहा व्हिडिओ)
ST Strike: मंत्रालयावर मोर्चासाठी निघालेल्या सदाभाऊ खोत, मोर्चेकरांना पोलिसांनी अडवलं

यानंतर शेजारील झोपड्यांमध्ये ही गाडी शिरली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, ऑडी कारने धडक दिल्यानंतर अनेक दुचाकी आणि नागरिक अक्षरशः उडताना दिसत आहेत. या अपघातानंतर तात्काळ स्थानिकांनी जखमी झाल्यानं उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर जोधपूर या ठिकाणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी ऑडी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. या बरोबरच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशी करुन, कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com