Hyderabad News: बापरे! ऑपरेशन करून तब्बल १० किलोंचा ट्यूमर काढला बाहेर; डॉ. म्हणाले हा तर फुटबॉल...

एशियन इन्स्टिट्यूट ऑफ नेफ्रोलॉजी अँड युरोलॉजी (एआयएनयू) मध्ये हा चकित करणारा प्रकार घडला आहे.
Hyderabad News
Hyderabad NewsSaam TV

Hyderabad News:शरीरात गाठी होणे आणि त्यावर उपचार करणे आजकाल या सामान्य गोष्टी आहेत. तुमच्या पैकी अनेकांनी ट्यूमरचे ऑपरेशन केले असेल. मात्र तुम्ही १० किलोंचा ट्यूमर कधी पाहिला आहे का? हैदराबादमध्ये एका व्यक्तीच्या किडनीतून तब्बल १० किलोंचा ट्यूमर बाहेर काढण्यात आला आहे. एवढा मोठा ट्यूमर पाहून डॉक्टरही चक्रावले आहेत.

हैदराबादमधील (Hyderabad) एशियन इन्स्टिट्यूट ऑफ नेफ्रोलॉजी अँड युरोलॉजी (एआयएनयू) मध्ये हा चकित करणारा प्रकार घडला आहे. ३५ वर्षांच्या एका व्यक्तीचे किडनीचे ऑपरेशन करुन ट्यूमर बाहेर काढण्यात आला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या ट्यूमरचा आकार आणि वजन पाहता तो एका फुटबॉल सारखा वाटतो आहे. यात विशेष बाब म्हणजे डॉक्टरांची ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. तसेच पेशंट देखील सुखरूप असल्याचे समजले आहे.

किडनी काढावी लागली

या शस्त्रक्रियेविषयी अधिक माहिती सांगताना डॉक्टर (Doctor) म्हणाले की, ट्यूमर फार मोठा होता. त्याने किडनीला कॅन्सही झाला होता. त्यामुळे आम्ही किडनी देखील काढली. ऑपरेशनवेळी त्यांच्या पोटाला सुज होती. मात्र तरी देखील डॉक्टरांनी यशस्वीरित्या ही शस्त्र क्रिया पूर्ण केली. डॉक्टरांसाठी हे मोठे आवाहन होते.

Hyderabad News
२१ दिवसांच्या मुलीच्या पोटात आढळले आठ भ्रूण, डॉक्टर चक्रावले, पालकांची उडाली झोप

राज्यात पहिल्यांदाच पार पडली अशी शस्त्रक्रीया

३५ वर्षीय व्यक्तीच्या पोटातून हा ट्यूमर काढणे सोपी गोष्ट नव्हती. यासाठी युरोलॉजीस्ट डॉक्टरांची एक स्पेशल टीम निवडण्यात आली होती. या टिमचे नेतृत्व डॉक्टर मल्लिकार्जुन करत होते. यासह हे ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी मॅनेजींग डायरेक्टर डॉक्टर तैफ बेन्दीगेरी आणि डॉक्टर राजेश हे देखील उपस्थीत होते. गुरूवारी ऑपरेशन सुरू होण्याआधी डॉक्टरांनी सांगितले होते की, देशातील हे दुसरे आणि राज्यातील पहिले एवढे मोठे ऑपरेशन आहे.

Hyderabad News
Hyderabad | हैद्राबाद दंगलीत आयसिसचा हात ?; भारतात अशांतता पसरवतंय कोण ?,पाहा व्हिडीओ

ट्यूमरमुळे आतड्यांनाही होत नव्हती जागा

सदर रुग्ण कडप्पा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पोटात दुखू लागले तेव्हा काही टेस्ट करण्यात आल्या. मात्र असह्य वेदना होत असल्याने त्यांना एआयएनयूमध्ये पाठवण्यात आले. इथे विविध टेस्ट केल्यावर त्यांच्या किडनीला ट्यूमर तयार होत असल्याचे समजले. नंतर हा ट्यूमर खूप वाढला आणि पोटाचा दोन - तृतीयांश भाग त्याने व्यापला. ट्यूमर जास्त प्रमाणात वाढल्याने आतडे देखील खालच्या दिशेला सरकू लागले होते. त्यामुळे डॉक्टरांनी रोबॉर्ट शस्त्रक्रिया रद्द करत ओपन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com