Afghanistan; तालिबानच्या मंत्रिमंडळात 27 नव्या मंत्र्यांचा समावेश

अफगाणिस्तान मधील तालिबानच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला आहे.
Afghanistan; तालिबानच्या मंत्रिमंडळात 27 नव्या मंत्र्यांचा समावेश
Afghanistan; तालिबानच्या मंत्रिमंडळात 27 नव्या मंत्र्यांचा समावेशSaam Tv

वृत्तसंस्था : अफगाणिस्तान Afghanistan मधील तालिबानच्या Taliban मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला आहे. २७ नव्या मंत्र्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हैबतुल्ला अखुनझादाच्या आदेशानुसार या नव्या मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात cabinet करण्यात आला आहे, असे तालिबानचा प्रवक्ता झबिबुल्ला मुजाहिद याने यावेळी सांगितले आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात २४ वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्री आणि उपमंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे. मौलवी शहाबुद्दीन देलावर याना खाण आणि पेट्रोलियम खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर मुल्ला मोहंम्मद अब्बास अखुंद याला आपत्ती व्यवस्थापन खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून करण्यात आले आहे. अन्य २५ जणांना उपमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

यामध्ये सरकारी खरेदी, शिक्षण, लेखापरिक्षण कार्यालय, तुरुंग प्रशासन, प्रशासकीय सुधारणा, सनदी सेवा आयोग, सीमा आणि आदिवासी भाग विकास, शहिद आणि अपंग कल्याण, ग्रामीण पुनर्वसन आणि विकास, माहिती आणि सांस्कृतिक मंत्रालय मधील अर्थ आणि प्रशासन, युवक व्यवहार, संवाद, रेड क्रॉस, कंदहार मधील अल बद्र कॉर्प्स, हेमंड प्रांतातील आझम कॉर्प्स, उर्जा आणि पाणी व्यवस्थापन या खात्यांच्या उपमंत्र्यांचा समावेश करण्यात आले आहे.

Afghanistan; तालिबानच्या मंत्रिमंडळात 27 नव्या मंत्र्यांचा समावेश
पिंपरीमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर रॉकेल बॉम्ब फेकले

सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला तालिबान अफगाणिस्तानचे नामकरण इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान Islamic Emirate of Afghanistan असे करण्यात आले आहे. यानंतर ३३ सदस्यांच्या हंगामी मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यातच तालिबानने या हंगामी मंत्रिमंडळात आणखी १७ मंत्रांचा समावेश करण्यात आला होता. आतापर्यंत तालिबानच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा किंवा अगोदरच्या सरकार मधील कोणत्याही राजकीय नेत्याचा समावेश नाही.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com