तिसऱ्या लाटेचा मुलांवर जास्त परिणाम होणार नाही; WHO,AIIMS सर्वेक्षण

देशात कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुलांवर फारसा परिणाम होणार नसल्याचा दावा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने केला आहे.
कोविड-19 

कोविड-19 

Twitter/ @ANI

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुलांवर फारसा परिणाम होणार नसल्याचा दावा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने केला आहे. एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. देशात जागतिक आरोग्य संघटना आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेने केलेल्या सेरोप्रेव्हलेन्स अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सर्वेक्षणाचे नेतृत्त्व करणारे कम्युनिटी मेडिसीनचे प्रोफेसर डॉ. पुनीत मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे.

संबंधित अभ्यासात मुलांमध्ये एसएआरएस-सीओव्ही -२ सेरो-पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. तथापि, या सर्वेक्षणात प्रौढ लोकसंख्येशी तुलना करता पाच निवडक राज्यांमधील 10,000 नमुन्यांचा यात अभ्यास करण्यात आला. भारताच्या चार राज्यांमधील मध्यावधी विश्लेषणाच्या वेळेच्या (सुरुवातीच्या) निकालासाठी 5000 सहभागींचा डेटा घेण्यात आला. तर पुढील दोन ते तीन महिन्यांत पुढील निकाल येण्याची शक्यता आहे.

<div class="paragraphs"><p>कोविड-19&nbsp;</p></div>
शेकडो वर्षांच्या पुरातन मुर्तींचे पंढरपूरात भाविकांना होणार दर्शन

सेरोप्रेव्हलेन्स अभ्यासात दक्षिण दिल्लीच्या शहरी भागात पुनर्वसन वसाहतींमध्ये लोकसंख्या खूपच जास्त (सेरो-एसेसमेंटमध्ये झालेली आतापर्यंतची सर्वाधिक नोंद) म्हणजेच, 74.7 टक्के इतकी आहे. दुसऱ्या लाटेच्या अगोदर दक्षिण दिल्लीतील 18 वर्षाखालील 74.8 टक्के मुलांपैकी मुले 73.9 टक्के इतकी सेरोप्रिव्हलेन्स होती. त्यामुळे "दिल्ली आणि एनसीआर (फरीदाबाद) या भागात कोरोनाच्या तीव्र दुसर्‍या लाटेचा सामना केल्यानंतर आता तिसऱ्या लाटेच्या विरोधात लढण्यासाठी मुलांमध्ये वाढलेली सेरोप्रिव्हलेन्सची पातळी अधिक संरक्षित असू शकते, असेही डॉ. मिश्रा यांनी म्हटले आहे.

तर, "दुसऱ्या लाटेदरम्यान दिल्लीतील फरीदाबाद (ग्रामीण भाग) मधील एनसीआर भागात सिरोप्रिव्हलेन्सचे प्रमाण 59.3 टक्के इतके होते. जे मागील राष्ट्रीय सर्वेक्षणाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यामुळे दिल्लीत शाळा उघडणे ही सर्वात जास्त जोखमीची गोष्ट ठरू शकत नाही.असे सर्वेक्षणातून आढळून आले आहे. त्याचबरोबर, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या दोन्ही भागात कोरोनाच्या वेगाने वाढणाऱ्या प्रकरणांमध्ये घट होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकूणच, सर्वेक्षणातून अर्ध्याहून अधिक (62.3) लोकांमध्ये यापूर्वीच संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. तर आदिवासी लोकसंख्या असलेल्या अगरतला ग्रामीण भागात कमीतकमी सेरोप्रिव्हलेन्स 51.9 टक्के इतके असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com