Viral Video: गुटखा थुंकायचाय म्हणत पठ्ठ्याने थेट विमानाची खिडकीच उघडायला सांगितली अन्...; व्हिडिओ तुफान व्हायरल

तो परत सांगताना म्हणतो की, खिडकी खोलाना मला गुटखा थुंकायचा आहे.
Viral Video
Viral VideoSaam TV

Viral Video: विमानातून प्रवास करता यावा असं प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहतो. यातील अनेक व्यक्ती आपलं स्वप्न पूर्ण देखील करतात. विमानात बसून फिरण्याची एक वेगळीच मज्जा असते. मात्र पहिल्यांदा प्रवास करताना मनात अनेक प्रश्न असतात. विमानात कोणतीही खिडकी उघडलेली नसते. मात्र लहान मुलं आकाशातील ढग आणि सुंदर दृश्य पाहण्यासाठी खिडकी उघडण्याचा हट्ट करतात. असाच हट्ट एका तरुणाने केला आहे. मात्र यासाठी त्याने सांगितलेलं कारण ऐकूण हवाई सुंदरी लोटपोट हसू लागते. (Latest Aeroplan Viral Video)

सध्या सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतं आहे. यात तरुण पहिल्यांदाच विमानातून प्रवास करत असावा असं वाटत आहे. तो प्रवास करत असताना एका हवाई सुंदरीला जवळ बोलावतो आणि खिडकी उघडा असे सांगतो. हवाई सुंदरी त्याला चकित काय? असा प्रश्न विचारते तेव्हा तो परत सांगताना म्हणतो की, खिडकी खोलाना मला गुटखा थुंकायचा आहे.

तरुणाने केलेली ही मागणी ऐकूण हवाई सुंदरीला हसू आवरत नाही. तसेच विमानात प्रवास करणारे इतर प्रवासी देखील जोरजोरात हसू लागतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तरुणाने केलेली ही मस्करी पाहून त्यांच्यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत. @videonation.teb या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडिओ पोस्ट करत खाली कॅप्शनमध्ये ' बोलो जूबांन केसरी' असे लिहिले आहे. हे मजेशीर कॅप्शन देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com