नाचता नाचता पडला, डान्स समजून सर्व Video काढत राहिले, पण तो उठलाच नाही

लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सर्वजण तिथे लावलेल्या डीजेच्या तालावर नाचत असताना तो अचानक खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नाचता नाचता पडला, डान्स समजून सर्व Video काढत राहिले, पण तो उठलाच नाही
man dies while dancing Saam TV

मध्य प्रदेश : एका नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात एका तरुण नाचता नाचता अचानक खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना मध्यप्रदेशातील बैतुल येथे घडली आहे. नातेवाईकाच्या लग्नात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अंतलाल उईके वय 32 असं आहे. अंतलाल हा त्याचा नातेवाईक सोनू कुमरे याच्या लग्नात जामुन धाना गावात आला होता.

शुक्रवारी लग्न होते आणि शनिवारी रिसेप्शन होतं. रिसेप्शनमध्ये सर्वजण तिथे लावलेल्या डीजेच्या तालावर नाचत असताना तो अचानक खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Man dies while dancing)

man dies while dancing
या तर नर्सच्या वेशातील पुतना; 10 दिवसाच्या बाळाला HIV आहे सांगून विकलं

मयत अंतलालचा नातेवाईक सोनू कुमरे याच्या लग्नाचे रिसेप्शन (Wedding Reception) सुरु असताना. आपल्या मित्र आणि नातेवाईकांसोबत तो रिसेप्शन मध्ये नाचत होता. अचानक नवऱ्याचा नातेवाईक तरुण जमिनीवर कोसळला मात्र मित्रांना वाटले तो खाली पडून मुद्दाम नाचत आहे.

हे देखील पहा -

मात्र खूप वेळ तो तसाच पडून राहिला तो परत उठलाच नाही आणि त्यामुळे उपस्थित लोक अंतलालकडे धावले तर तो बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शिवाय या तरुणाचा मृत्य़ू कसा झाला हे PM रिपोर्ट आल्यानंतरच नेमकं कारण समोर येईल असं पोलिस म्हणाले आहेत. मयत अंतलाल विवाहित असून त्याला 5 वर्षांची मुलगी आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.