इस्राईलमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना मिळणार कोरोना लसीचा तिसरा डोस
इस्राईलमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना मिळणार कोरोना लसीचा तिसरा डोसSaam Tv

इस्राईलमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना मिळणार कोरोना लसीचा तिसरा डोस

इस्त्राईलच्या आरोग्य मंत्रालयाने तेथील कोरोना लसीच्या (Corona Vaccine Third Dose) तिसर्‍या डोसला मान्यता दिली आहे.

इस्त्राईलच्या आरोग्य मंत्रालयाने तेथील कोरोना लसीच्या (Corona Vaccine Third Dose) तिसर्‍या डोसला मान्यता दिली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आरोग्य देखभाल संस्थेला ते सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना लसीचा तिसरा डोस अशा प्रौढांना दिला जाईल ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत आहे किंवा विषाणूशी लढा देण्याची प्रतिकारशक्ती खूप कमी आहे. याबाबत सोमवारी आदेशही देण्यात आले आहेत. यापूर्वी रविवारी देशाचे आरोग्यमंत्री नितजन होरोविझ यांनी याबाबत माहिती दिली होती.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, काही दिवसांपुर्वी मंत्रालयाने कोरोनाचा तिसरा डोस सर्वसामान्यांना देण्याची शक्यता विचारात घेतली होती. हे निवेदन त्यांच्या वतीने अशा वेळी देण्यात आले होते जेव्हा अमेरिका आणि युरोपमधील फायझर (Pfizer Vaccine) कंपनीने पुन्हा सीडीसी व तेथील औषध नियंत्रकांकडून कोरोनाचा बूस्टर शॉट देण्यासाठी परवानगी मागितली होती.

इस्राईलमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना मिळणार कोरोना लसीचा तिसरा डोस
रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डमध्ये अग्नितांडव: 58 जणांचा होरपळून मृत्यू

तथापि, अमेरिकेने या संदर्भातील कंपनीचे युक्तिवाद नाकारले आणि स्पष्टपणे सांगितले की सध्या अशा प्रकारच्या बूस्टर शॉट्सची आवश्यकता नाही. इस्रायलमध्ये कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. त्यामुळे कोरोना निर्बंध वाढवण्यात आले आहेत. इस्राईलमध्ये वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमुख कारण डेल्टा व्हेरिएंट सांगितले जात आहे.

रविवारी इस्रायलमध्ये कोरोनाचे 423 नवीन रुग्ण आढळले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार 9.25 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या देशातील सुमारे 60 टक्के लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. त्याच वेळी, सुमारे 55 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. यापैकी बहुतेकांना फायझर लस देण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com