लग्नाच्या तीन दिवस आधी पत्रिका वाटायला गेली, तिघांनी केला तरुणीवर बलात्कार!

१८ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Rape crime
Rape crimesaam tv

उत्तरप्रदेश : येथील झांसी जिल्ह्यात एका १८ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार (Gang rape) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. पीडित तरुणी तिच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका (wedding cards) देण्यासाठी गेली असता तीन नराधमांनी तिचं अपहरण (kidnapping) करुन सामुहिक बलात्कार केला. याप्रकरणी तेहराऊली पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत (Police Fir Filed) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rape crime
पेन्शनधारकांना मोठा दिलासा! EPFO ने 'लाइफ सर्टिफिकेट' सादर करणे केले सोपे

याबाबत सविस्तर वृत्त असं की, पीडित तरुणीने तिच्यावर झालेल्या बलात्काराप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीत पीडितेनं म्हटलंय, २१ एप्रिलला माझं लग्न होतं. १८ एप्रिलला मी लग्नाच्या निमंत्रण पत्रिका देण्यासाठी रस्त्यावरुन जात असताना तीन इसमांनी माझं अपहरण केलं. त्यानंतर त्या इसमांनी माल वेगवेगळ्या ठिकणी कोंडून ठेवलं. त्यानंतर त्यांच्या टोळीतील मुख्य आरोपीनं काही दिवस मला झांसीमध्ये ठेवलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीसोबत राहण्यासाठी पीडितेला मध्यप्रदेशच्या डाटीया गावात जबरदस्तीने आरोपींनी ठेवलं होतं. त्यानंतर पीडितेनं तिच्या वडिलांना संपर्क साधून झालेल्या सर्व प्रकाराबाबत माहिती दिली. त्यांनंतर पोलिसांच्या मदतीनं पठारी गावातून पीडितेची सुटका करण्यात आली.

Rape crime
Appleच्या इंजिनिअरने दिला थेट राजीनामा, कारण जाणून आश्चर्य वाटेल!

"पीडित महिलेनं तिच्या सोबत झालेल्या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. काही इसमांनी अपहरण केल्यानंतर सामुहिक बलात्कार केरुन मला विकण्याचा प्रयत्नही केला. असा आरोप पीडितेनं केला आहे.त्यांनंतर आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर घटनेचा तपास सुरु असून आरोपी कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जातील", अशी माहिती सर्कल ऑफिसर अनुज सिंग यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com