Viral video: शिकार करताना वाघाला अक्षरशः घाम फुटला; जंगलाच्या राजाची कोणी केली ही दशा?

मात्र खट्याळ माकड अशा हिंस्र प्राण्यांना देखील चांगलीच अद्दल घडवतं.
Viral video
Viral videoSaam TV

Viral Video : वाघ, सिंह, चित्ता असे अनेक हिंस्र प्राणी आपले शिकार खूप चलाखीने पकडतात. एकदा का कोणी त्यांच्या तावडीत सापडलं की, त्याचा फडशा पडल्याशिवाय राहत नाहीत. मात्र खट्याळ माकड अशा हिंस्र प्राण्यांना देखील चांगलीच अद्दल घडवतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतं आहे. (Latest Viral Video)

व्हिडिओमध्ये एक वाघ झाडावर बसलेल्या माकडाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र माकड काय त्याच्या हाती लागेना. वाघ जवळ आला की माकड या फांदीवरून त्या फांदीवर उडी घेत आहे. माकडाला पकडण्यासाठी वाघ देखील जिवाच्या आकांताने प्रयत्न करत आहे. मात्र माकडाच्या चापळतेने या माकडाला अक्षरशः घाम फुटला आहे.

Viral video
Viral Video: व्हायरल व्हिडिओनंतर पुन्हा स्पॉट झाले हे कपल, तमन्ना भाटिया-विजय वर्माला एकत्र पाहून फॅन्स हैराण

माकडाने एवढा त्रास दिल्यावर आता वाघ देखील हट्टाला पेटतो. त्याला काही करून माकडाची शिकार करायची असते. त्यामुळे तो देखील हळूहळू दुसऱ्या फांदीवर जातो. पण माकड तिथूनही त्याच्या शेपटी मागून दुसऱ्या फांदीवर पळून जाते. जवळपास तास भर या दोघांचा पकडापकडीचा हा खेळ सुरू राहतो. अशात वाघ रागात दुसऱ्या फांदीवर झेप घेतो आणि त्याचीच फजिती होते. फांदी सुकलेली असते त्यामुळे वाघाच्या वजनाने ती कडाकड मोडून जाते.

तिथे असल्या काही व्यक्तींनी वाघ आणि माकडाची ही जुगलबंदी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. @Weird and Terrifying या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यावर काही तासांतच त्याला ९ लाखांहून अधिक व्यक्तींनी पाहिले आहे. नेटकरी माकड आणि वाघाच्या या जोडीत मकडचं राजा ठरला असं म्हणत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com