भारतात नव्या आशेने टिकटॉक परत येण्याच्या तयारीत...

अत्यंत लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉक लवकरच भारतात पुनरागमन करू शकणार आहे. अहवालानुसार, टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडांस ने भारतीय पेटंट कार्यालयाकडे एक नवीन ट्रेडमार्क दाखल केला आहे.
भारतात नव्या आशेने टिकटॉक परत येण्याच्या तयारीत...
भारतात नव्या आशेने टिकटॉक परत येण्याच्या तयारीत...Saam Tv

पुणे : अत्यंत लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉक लवकरच भारतात पुनरागमन करू शकणार आहे. अहवालानुसार, टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडांस Bytedance ने भारतीय पेटंट कार्यालयाकडे एक नवीन ट्रेडमार्क दाखल केला आहे. या ट्रेडमार्कमध्ये टिकटॉकचे स्पेलिंग देखील बदलले गेले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये भारत सरकारने टिकटॉक सह 56 चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर टिकटॉक अॅप भारतीय वापरकर्त्यांसाठी बंद झाले होते.

हे देखील पहा-

अ‍ॅप नवीन नावाने येईल का?
टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी आपल्या ट्विटर पोस्टवर हा ट्रेडमार्क उघड केला आहे. पोस्टने दावा केला की बाईटडन्सने 6 जुलै रोजी टिकटॉक या शीर्षकासह ट्रेडमार्क ऐप्लिकेशन दाखल केल होत. ज्याचं नाव TickTock होत.


भारत सरकारशी चर्चा
माध्यमांच्या वृत्तानुसार बाइटडांस टिकटॉक भारतात परत येण्यासाठी भारत सरकारशी चर्चा करीत आहे. नवीन आयटी नियमांचे पालन करण्याचे काम करणार असल्याचेही कंपनीने अधिकाऱ्यांना आश्वासन दिले. इतकेच नव्हे तर बाईटडन्सने 2019 मध्येच मुख्य चीफ नोडल व तक्रार अधिकारी भारतात नियुक्त केले होते, जे आयटीच्या नवीन नियमांमधील अनिवार्य सूचनांपैकी एक आहे.

भारतात नव्या आशेने टिकटॉक परत येण्याच्या तयारीत...
चंद्रपुरात गाजतंय शिक्षणाच दिल्ली मॉडेल

इन्स्टाग्राम आणि फेसबुकला टक्कर
भारतात टिकटॉक अॅपची चांगलीच प्रसिद्धी झाली होती. बंदीच्या वेळी, टिकटॉकचे भारतात सुमारे 200 दशलक्ष वापरकर्ते होते. अ‍ॅपवर 15 सेकंदाचे व्हिडिओ तयार करणे आणि पाहिले जाणे, जे मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण यासह विविध श्रेणीचे होते. टिकटॉक बंद झाल्यानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामने रील्स Reels यासारखेच नवीन फिचर सुरू केले. तर युट्यूबने शॉर्ट्सच्या नावाने त्याची ओळख करुन दिली. टिकटोकच्या परतीमुळे इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबमध्ये कडक स्पर्धा होईल.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com