Goa Elections: 'बादशहा' संबोधत तृणमूळ नेत्यानं उडवली राहुल गांधींची खिल्ली

काँग्रेस भाजपला हरवू शकत नसेल तर काय उपयोग? ते ज्या जागा जिंकतात त्या सोडून उरलेल्या जागांवर पर्याय उभा करायला नको का? असे विचारत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी आज काँग्रेस पक्षावर टीका केली
Goa Elections: तृणमूल नेत्या महुआ मोईत्रांनी साधला काँग्रेसवर निशाणा
Goa Elections: तृणमूल नेत्या महुआ मोईत्रांनी साधला काँग्रेसवर निशाणा- Saam Tv

(प्राची कुलकर्णी)

पणजी : काँग्रेस भाजपला हरवू शकत नसेल तर काय उपयोग? ते ज्या जागा जिंकतात त्या सोडून उरलेल्या जागांवर पर्याय उभा करायला नको का? असे विचारत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी आज काँग्रेस (Congress) पक्षावर टीका केली. गोव्यात विधानसभेच्या निवडणुका (Goa Assembly Elections) जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज गोव्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (TMC Leader Mahua Moitra Criticism on Congress in Goa)

त्या म्हणाल्या, "ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्षांची ताकद आहे तिथल्या जागा महत्वाच्या आहेत, काँग्रेस आमचा विरोधक नाही. आमचा विरोधक भाजप आहे. ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) काही सिद्ध करायची गरज नाहीये. आम्ही मतं फोडायला नाही पर्याय द्यायला आलोय. महाविकास आघाडी सारखा प्रयोग करणे एकत्र येणे या म्हणण्यात तथ्य आहे. शरद पवार जे म्हणतात ते बरोबर आहे. आम्हाला भाजप विरोधात एकत्र यायला तयार असणाऱ्यांना सोबत घ्यायला काहीच अडचण नाही. पण तो राष्ट्रीय पक्ष (काँग्रेस) त्यांचा इगो सोडून येऊ शकतो का हा प्रश्न आहे,''

''टीएमसीचं मिशन गोवा आहे. भाजप नको असलेल्या लोकांना पर्याय देणं हे आमचे मिशन आहे आहे. भाजपला आम्ही हरवू शकतो हे ममता बॅनर्जींनी सिद्ध केलं आहे. २००४-२००९ चं युपीए आता राहील नाहीये. २०१४ नंतर युपीए कुठंय? देश बदललाय. आत्ताचा देश वेगळा आहे त्यासाठी या आघाडीच्या पण पुनर्निर्माणाची गरज आहे. कोणी असं म्हणत असेल की आम्ही बादशाह म्हणूनच जन्माला आलोय- बाकीच्यांनी यावं आमच्यासाठी तर त्याला काय करणार? आता जो ताकदवान त्याला पाठिंबा मिळेल,'' असेही त्या म्हणाल्या

Goa Elections: तृणमूल नेत्या महुआ मोईत्रांनी साधला काँग्रेसवर निशाणा
UP Elections 2022: नवाब मलिक घेणार सपा नेते अखिलेश यादव यांची भेट...

''ममता बॅनर्जी म्हणत नाहीत की मला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणा," असं सांगत मोईत्रा यांनी राहुल गांधी व काँग्रेस यांनाही टोला लगावला. भाजपने फक्त बोलणारे नाही तर ते ऐकणारे आणि त्याची वाहवा करणारे पण तयार केले आहेत

- मोदींना हरवू शकत नाही ही परिस्थिती आता नाही. दोन राज्यांत ते हरले. ही सुरुवात आहे. आता पंजाब युपी यासाठी महत्वाचं. आम्ही मेघालय मध्येही निवडणूक लढवणार, आहोत असेही मोईत्रा यांनी स्पष्ट केले. ममता बॅनर्जी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत? मोदी मुख्यमंत्र्याचे पंतप्रधान झाले मग ममता का नाही?, असा सवालही मोईत्रा यांनी उपस्थित केला.

Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com