
तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांना पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने मंगळवारी कोलकाता कार्यालयात नुसरत जहाँ यांची चौकशी केली.
माहितीनुसार, नुसरत यांच्यावर शहरातील न्यू टाऊनमध्ये फ्लॅटचे आश्वासन देऊन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी नुसरत जहाँ याच प्रकरणात ईडीसमोर हजर झाल्या होत्या. (Latest Marathi News)
2014-15 मध्ये 400 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एका कंपनीत पैसे जमा केले होते. यादरम्यान प्रत्येक व्यक्तीकडून 5.5 लाख रुपये घेण्यात आले आणि त्या बदल्यात त्यांना 1000 स्क्वेअर फूट फ्लॅट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तसे झाले नाही आणि ना फ्लॅट कोणाला मिळाला, ना पैसे परत मिळाले. (Political News)
कंपनीत घोटाळा झाला त्या काळात नुसरत या कंपनीच्या संचालक होत्या. याप्रकरणी भाजप नेते शंकुदेव यांनी ईडीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ईडीने कारवाई सुरु केली. मात्र नुसरत यांनी म्हटलं की, अशा कोणत्याही कंपनीशी संबंध नाही आणि या प्रकरणाच्या तपासात पूर्ण सहकार्य करेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.