Gold Silver Price : सोन्याच्या दरात मोठी घसरण; खरेदीसाठी उत्तम संधी, जाणून घ्या आजचा भाव

तुम्ही जर स्वस्तात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Gold-Silver Price
Gold-Silver Price Saam TV

Today Gold Silver Price : तुम्ही जर स्वस्तात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या (Gold) दरात सलग दुसऱ्या दिवस घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोनं खरेदी करणं स्वस्त झालं आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली असली, तरी चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today)

Gold-Silver Price
Crime News : दिल्ली पुन्हा हादरली! तरुणानं अख्खं कुटुंबच संपवलं

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

बुधवारी सराफा बाजार खुलताच, सोन्याच्या दरात 80 रुपयांची घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 48,340 हजारांवर आला आहे. याशिवास 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली. 24 कॅरेट सोन्याचा भाव तब्बल 110 रुपयांनी घसरून 52 हजार 640 रुपये इतका झाला.

आजचा चांदीचा भाव काय?

एकीकडे सोन्याच्या भावात घसरण झाली असली, तरी दुसरीकडे चांदीच्या (Silver)  दरात मात्र, वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज चांदीचा दरात प्रतिकिलो 180 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचे दर 61 हजार 166 रुपयांवर पोहचले आहेत. सराफा बाजार उघडताच, चांदीचा भाव 61,125 रुपयांवर आला होता. मात्र, त्यानंतर त्यात वाढ झाली.

Gold-Silver Price
Nanded Crime : विवाहित महिलेला हॉटेलवर घेऊन गेला; तरुणासोबत घडली भयंकर घटना

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.

वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com