प्रवास महागणार! आज रात्रीपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल टॅक्स 10 ते 15 टक्क्यांनी वाढला

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमध्ये (Petrol Diesel Price Hike) आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून राष्ट्रीय महामार्गावरील (National Highways) प्रवास महागणार आहे.
Toll Plaza
Toll PlazaSaam Tv

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमध्ये (Petrol Diesel Price Hike) आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून राष्ट्रीय महामार्गावरील (National Highways) प्रवास महागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) राष्ट्रीय महामार्गावरील टोल करात 10 ते 65 रुपयांची वाढ केली आहे. तर छोट्या वाहनांसाठी 10 ते 15 रुपयांनी वाढ, तर व्यावसायिक वाहनांसाठी 65 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

उद्या 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करण्यासाठी लोकांना जास्त पैसे मोजावे लागणार असल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि दिल्लीला जोडणाऱ्या बहुतांश महामार्गांवरील टोल टॅक्समध्ये किमान 10 टक्के वाढ झाली आहे. किमती वाढल्यानंतर आता कार मालकांना किमान 5 रुपये अधिक कर भरावा लागू शकतो. माहितीनुसार, उत्तर प्रदेश-हरियाणामध्ये येणाऱ्या कुंडली-मानेसर-पलवल महामार्गावर आता कारकडून 1.46 रुपयांऐवजी 1.61 रुपये प्रति किलोमीटर टोल लोकांकडून आकारला जाणार आहे.

Toll Plaza
पेट्रोल-डिझेलच्या दरापासून मिळणार दिलासा? रशियाची भारताला कच्च्या तेलाच्या किमतीवर ऑफर!

तर, नोएडा-आग्रा, आग्रा-लखनौ एक्सप्रेस-वे (Express Way) आणि मेरठ-हरिद्वार महामार्गावर टोलचे दर वाढवण्यात आलेले नाहीत. जुलै ते सप्टेंबर दरम्यान या महामार्गांवरील टोल टॅक्समध्ये वाढ होऊ शकते, असे मानले जात आहे. तर, दिल्लीतील (Delhi) सराय काले खान ते डासना गाझियाबाद दरम्यान कोणताही टोल भरावा लागणार नाही आहे.

हे देखील पहा-

NHAI नुसार, दिल्लीतील सराय काले खान येथून चढणारी वाहने रसूलपूर सिक्रोड (अंतर कमीतकमी 31 किमी) येथे उतरल्यास लोकांना 100 रुपये टोल टॅक्स भरावा लागेल. तसेच, सराई काळे खान ते भोजपूर (अंतर 45 किमी) खाली उतरल्यास 130 रुपये टोल टॅक्स आकारला जाईल. त्याचप्रमाणे लोकांना रसूलपूरपर्यंत बस आणि ट्रकसाठी 345 रुपये आकारले जातील. भोजपूरपर्यंत 435 रुपये आणि मेन प्लाझा काशीपर्यंत 520 रुपये मोजावे लागतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com