New Innova Car: पॉवरफूल इंजिन, दमदार स्पीड, बेस्ट मायलेज... अशी आहे नवीन इनोव्हा; पाहा PHOTO

नव्या इनोव्हाला आलिशान इंटिरियर्ससह पॅनोरॅमिक सनरूफ देखील देण्यात आला आहे.
Innova
InnovaSaam TV

मुंबई : Toyota Innova HYCROSS आज लॉन्च करण्यात आली. अतिशय स्मार्ट आणि अॅडव्हान्स टेक्नोलॉजीने ही कार सुसज्ज आहे. ही एक हायब्रीड कार आहे. नवीन मजबूत-हायब्रीड पॉवरट्रेनसह, नवीन इनोव्हा हायक्रॉस भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहे. कंपनी इनोव्हा क्रिस्टाची विक्री सुरू ठेवणार आहे. (Car)

पॅनोरामिक सनरूफ

नव्या इनोव्हाला आलिशान इंटिरियर्ससह पॅनोरॅमिक सनरूफ देखील देण्यात आला आहे. तुम्ही एसीचे तापमान पुढे आणि मागील बाजूनुसार अॅडजस्ट करू शकता.

Innova
Tata Motors : टाटाची नवीकोरी 'कडक' इलेक्ट्रिक कार आली; 10 भन्नाट फीचर्स अन् रेंजही तुफानी...

दमदार स्पीड

नवीन इनोव्हा हायक्रॉस कार 9.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठते. त्यामुळे वेगाची आवड असणाऱ्यासाठी देखील ही कार चांगला ऑप्शन असू शकते.

मजबूत इंजिन

नवीन टोयोटा इनोव्हा हायक्रॉस कार TNGA 2.0-लिटर इंजिनद्वारे सपोर्टेड आहे. जी 5th जनरेशन HEV सिस्टमसह सुसज्ज आहे.

Innova
Tata Motors: तुमच्या बजेटमधील इलेक्ट्रिक कार आली; फक्त २१ हजारांत बुक करा!

9 स्पीकर

म्युझिक प्रेमींसाठी नवीन Toyota Innova HYCROSS MPV मध्ये उत्तम अनुभव असेल. यात JBL ब्रँडचे एकूण 9 स्पीकर आहेत.

21 किमी पेक्षा जास्त मायलेज

नवीन टोयोटा इनोव्हा हायक्रॉस कार 21.1 किमी प्रतितास मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने Toyota Innova HYCROSS मध्ये या सेगमेंटमध्ये 2850mm चा सर्वात लांब व्हील बेस दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com