Indian Railway New Rules : AC कोचमधून प्रवास करणाऱ्यांना रेल्वे कंटाळली, जारी केले नवे नियम ! फॉलो न केल्यास भरावा लागेल दंड...लागेल दंड !

Railway New Guideline : तुम्ही देखील यंदाचा प्रवास एसीने करणार असाल तर आधी रेल्वेच्या या नियमांबद्दल जाणून घ्या.
Indian Railway New Rules
Indian Railway New RulesSaam Tv

Indian Railway Passengers : गावी जाणाऱ्या ट्रेनमधून अनेक प्रवासी नियमितपणे प्रवास करत असतात. सध्या उन्हाळ्याच्या हंगामात गावी जाणारे माणसं ही अधिक आहे. परंतु, अनेकदा प्रवास सुखकर करण्यासाठी आपण एसीचे तिकीट बुक करतो. अशातच तुम्ही देखील यंदाचा प्रवास एसीने करणार असाल तर आधी रेल्वेच्या या नियमांबद्दल जाणून घ्या.

भारतीय (Indian) रेल्वेनुसार एसी कोचमध्ये दिली जाणारी चादर, टॉवेल, उशी व इतर सुविधांचा ग्राहक गैरवापर करतो. त्यात दिले जाणारे अर्धे सामान हे गायब असते. असे भारतीय रेल्वेचे म्हणणे आहे. परंतु ज्यापुढे एसी कोचने प्रवास करत असाल व तुमच्याकडून रेल्वेचे (Railway) कोणतेही नुकसान झाल्यास कारवाई करण्यात येईल.

Indian Railway New Rules
Konkan Travel Plan : 'येवा कोंकण आपलोच आसा...', मे महिन्यात कोकणात जाण्याचा प्लान करताय ? या ठिकाणांना नक्की भेट द्या

1. लाखोंचे नुकसान

प्रवाशांच्या या सवयींमुळे यंदा रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. बेडशीट, ब्लँकेट व्यतिरिक्त प्रवासी (Passenger) चमचे, किटली, नळ, टॉयलेट बाऊल चोरतात त्यामुळे रेल्वेला अधिक नुकसान सहन करावे लागत आहे.

2. ४ महिन्यात ५५ लाखांची चोरी

रेल्वेने सांगितले आहे की, बिलासपूर झोनमधून धावणाऱ्या गाड्यांमध्ये गेल्या ४ महिन्यांत सुमारे ५५ लाख रुपायांचा माल चोरीला गेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार गेल्या चार महिन्यांत 55 लाख 97 हजार 406 रुपयांचा माल चोरीला गेला आहे.

Indian Railway New Rules
Honeymoon Summer Travel : उन्हाळ्याच्या सुट्टीत हनीमूनसाठी ही 8 ठिकाणे ठरतील बेस्ट !

3. किती झाली चोरी

गेल्या चार महिन्यात 12886 फेस टॉवेल चोरीला गेले आहेत, ज्याची किंमत 5,59,381 रुपये आहे. त्याचवेळी एसीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या 4 महिन्यांत 18,208 बेडशीट चोरीला गेल्या आहेत. त्याची किंमत सुमारे 28,16231 रुपये आहे. याशिवाय 19,767 पिलो कव्हरची किंमत 10,14837 रुपये, 2796 ब्लँकेटची किंमत 11,71999 रुपये, 312 उशांची किंमत 34956 रुपये आहे.

4. यापुढे ५ वर्षांचा तुरुंगवास होईल

भारतीय रेल्वेने सांगितले आहे की, सामानाची चोरी करणे कायद्याने चुक आहे. अशा प्रवाशांवर रेल्वे मालमत्ता कायदा १९६६ अंतर्गत कारवाई करणार आहे. यामध्ये प्रवाशांना दंड तर करण्यात येईलच परंतु पैसे देखील भरावे लागतील. यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ५ वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे आणि रेल्वेकडून दंडही ठोठावला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com