दिल्लीकरांची पहाट सुखद, तापमानात घट; वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

खराब हवामानामुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
Delhi Rain, Delhi Latest Marathi News, Delhi News, Weather News Updates
Delhi Rain, Delhi Latest Marathi News, Delhi News, Weather News UpdatesSaam Tv

नवी दिल्ली - उष्णतेमुळे होरपळलेल्या दिल्लीकरांना (Delhi) काहीसा दिलासा मिळाला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये पहाटेपासून सुसाट वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. (Delhi Latest Marathi News)

त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे झाडे पडल्यामुळे दिल्लीच्या काही भागांमध्ये रस्ते बंद झाल्याची अनेक चित्रेही समोर आली आहेत. पावसामुळे (Rain) वीजपुरवठा देखील खंडित जाला आहे. खराब हवामानामुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

आज दिल्लीत कमाल तापमान 39 आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. गडगडाटासह पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. मंगळवारीही असेच वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, बुधवार ते शनिवारपर्यंत आकाश ढगाळ राहील आणि अधूनमधून गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारपासून हवामान निरभ्र होण्याची शक्यता आहे.

या भागात पाऊस सुरूच राहणार

दिल्ली आणि एनसीआर जवळील परिसर लोनी देहाट, हिंडन एएफ स्टेशन, बहादुरगढ, गाझियाबाद, इंदिरापुरम, छपरौला, नोएडा, दादरी, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद, मानेसर, रेवाडी, पलवल, बावल, नूह, औरंगाबाद, सिकंदराबाद, चंदौसी, बुलंदशाह, जहंगराबाद , अनुपशहर, बहाजोई, बरेली, शिकारपूर, खुर्जा, पहासू, देबाई, नरोरा, गभना, सहसवान, जट्टारी, अत्रौली, खैर, अलीगढ, कासगंज, नांदगाव, इग्लास, सिकंदर राव, बरसाना, राया, हाथरस येथे पाऊस आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सोसाट्याचा वारा सुरू राहील.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com