त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांनी दिला राजीनामा; त्रिपुरात भाजपने केले बदल

भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या नेत्याच्या निवडीसाठी भूपेंद्र यादव, विनोद तावडे यांना निरीक्षक म्हणून येणार आहेत.
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांनी दिला राजीनामा; त्रिपुरात भाजपने केले बदल
Biplab Kumar Dev Saam Tv

अगरतला: त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव (Biplab Kumar Dev) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीमाना दिला आहे. त्यांनी राजीनामा राज्यपाल एसएन आर्य यांच्याकडे राजीनामा दिला आहे. देव यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनामाचे कारण अजुनही सोमर आलेले नाही. पक्षाच्या बळकटीसाठी काम करण्याचे पक्षाने सांगितले असल्याचे बिप्लब कुमार देव म्हणाले. त्रिपुरामध्ये (Tripura) भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यात नवा नेता निवडला जाणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या नेत्याच्या निवडीसाठी भूपेंद्र यादव, विनोद तावडे यांना निरीक्षक म्हणून येणार आहेत.

Biplab Kumar Dev
Ketaki Chitale: केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात

त्रिपुरामध्ये पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका (Election) होणार आहेत. मागिल विधानसभेच्या निवडणुका २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुका ६० सदस्यांसाठी होणार आहे. मागच्या टर्मला भाजपने ३६ जागांवर विजय मिळवून पहिल्यांदा त्रिपुरामध्ये सरकार स्थापन केले होते. त्या निवडणुकीत डाव्या पक्षांना फक्त १६ जागा मिळाल्या होत्या. तर त्रिपुरामध्ये (Tripura) जवळपास तीन दशके डाव्यांचे वर्चस्व होते.

बिप्लब कुमार देव यांच्या राजीनाम्यावर तृणमूल काँग्रेसने टीका केली आहे. बिप्लब कुमार देव अपयशी ठरले आहेत, अशी टीका तृणमूल काँग्रेसने ट्विट करून केली. त्यांच्या निष्क्रियतेवर पक्षाचे सर्वोच्च नेतृत्वही नाराज झाले. त्रिपुरामध्ये टीएमसीच्या वाढत्या प्रभावामुळे भाजप नेतृत्व अस्वस्थ झाल्याचेही बोलले जात आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.