खुशखबर! भारतात लवकरच लॉंच होणार हायड्रोजनवर चालणारी बाईक; वाहन कंपनीची मोठी घोषणा

ईव्ही मेकर ही कंपनी हायड्रोजनवर चालणारी वाहने भारतात लॉंच करणार आहे.
Triton EV Hydrogen Bike
Triton EV Hydrogen BikeSaam TV

नवी दिल्ली: देशात इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे अनेक वाहन कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनं बाजारात आणली आहे. अशातच यूएस स्थित ट्रायटन इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी भारतात आपले पहिले मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने लवकरच हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या दुचाकी आणि तीन चाकी गाड्या लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे.

Triton EV Hydrogen Bike
अरे बापरे! अचानक गावात शिरल्या चक्क १० ते १५ मगरी; पुढे काय झालं? पाहा...

ईव्ही मेकर ही कंपनी हायड्रोजनवर चालणारी वाहने भारतात लॉंच करणार आहे. लॉन्चची टाइमलाइन अद्यापही उघड झालेली नाही. ट्रायटन इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे सीईओ आणि सह-संस्थापक हिमांशू पटेल यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. “लवकरच भारतातील रस्त्यांवर हायड्रोजन इंधनावर चालणारी आमची दुचाकी दिसेल ,” असं त्यांनी म्हटलं आहे.

"झपाट्याने होणारे बदल पाहता, हायड्रोजन-इंधनावर असलेली वाहने कंपनी तयार करेल" असंही पटेल यांनी म्हटलं आहे. याआधी मार्चमध्ये कंपनीने जाहीर केले होते की, भारतात इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्यासाठी, आम्ही गुजरातमधील भुज शहराची निवड केली आहे. कंपनी सध्या दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची निर्मिती करण्यास भर देणार आहे.

Triton EV Hydrogen Bike
शिक्षक भरती घोटाळा, बड्या मंत्र्याच्या घरात सापडला पैशांचा ढीग; ईडीने घेतलं ताब्यात

ट्रायटन ईव्हीचा भुज प्लांट 600 एकरवर उभारण्यात आला आहे. पूर्ण झाल्यावर हा प्लांट 3 दशलक्ष चौरस फूट आकाराचा असेल. ट्रायटन EV द्वारे भारतात उत्पादित केली जाणारी हायड्रोजन-आधारित वाहने गुजरातची राजधानी अहमदाबादजवळील आनंद येथील संशोधन आणि विकास केंद्रात विकसित केली जात आहेत.

इलेक्ट्रिक वाहनेही बनवणार

ट्रायटन EV कंपनी सुरूवातीला आपला प्लांट तेलंगणामध्ये सुरू करेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर कंपनीने गुजरातमध्ये प्लांट टाकण्याचा निर्णय घेतला. कंपनीने आपल्या भारतातील योजनांची घोषणा करताना गेल्या वर्षी हैदराबादमध्ये आपली आठ-सीटर एच इलेक्ट्रिक SUV लॉंच केली.

इलेक्ट्रिक कार, SUV आणि पिकअप ट्रक तयार करण्यासाठी देशात स्थानिक उत्पादन सुविधा स्थापन करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. तयार झालेली ही वाहने भारतात विकल्या जातील आणि इतर आग्नेय आशियाई बाजारपेठांमध्येही पाठवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com