Viral Video: महिला अँकर बोलता बोलता धाडकन खाली कोसळली; लाईव्ह बुलेटिनदरम्यान घडलेल्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल

TV Anchor Video : एलिसा कार्लसन असं या महिला अँकरचं नाव आहे.
TV Anchor
TV Anchor Saam TV

Viral News : लाईव्ह बुलेटिनदरम्यान महिला न्यूज अँकर स्ट्रोक येऊन कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल होत. सीबीएस न्यूज चॅनलच्या लाईव्ह वेदर शोदरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एलिसा कार्लसन असं या महिला अँकरचं नाव आहे. (Viral Video)

व्हिडीओतील दृष्यांनुसार, दो महिला अँकर न्यूज देत आहेत. दरम्यान वेदर अपडेटसाठी या दोन्ही महिला एलिसा कार्लसन यांच्याकडे जातात. दोघींपैकी एक अँकर एलिसाला काही प्रश्न विचारते. मात्र प्रश्नादरम्यानच एलिसा अचानक लाईव्ह शोमध्ये खाली कोसळते. (Latest News)

TV Anchor
CCTV Footage : थरार! ओव्हरटेक करुन धडक देत गाडी थांबवली, मग गोळीबार अन् कोयत्याने वार VIDEO

दोन्ही अँकर्सना काय करावं हे सूचत नाही, हे स्पष्ट दिसून येत आहे. लाईव्ह बुलेटिन सुरुच ठेवायचं की एलिसाला मदत करायची. मात्र एक अँकर पटकन उठते आणि एलिसाकडे धाव घेते. मिळालेल्या माहितीनुसार, शो दरम्यान एलिसाची तब्येत आधी बिघडली होती. कारण तिचे डोळे मागे फिरवताना दिसत होते.

TV Anchor
Nashik News: सख्ख्या मुलांकडून बेदम माहराण करत बापाची हत्या, आईनेही केली मदत; नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना

अशीही माहिती समोर येत आहे की, लाईव्हदरम्यान एलिसावर मेडिकल इमर्जन्सीची ही पहिलीच वेळ नाही. आउटलेटनुसार, 2014 मध्ये, वेदर रिपोर्टदरम्यान तिला सेटवर उलट्या झाल्या होत्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com