ANI Twitter Locked : ट्विटरने 'एएनआय'चे अकाउंट केले लॉक, जाणून घ्या काय आहे कारण

ट्विटरने 'एएनआय'चे अकाउंट केले लॉक, जाणून घ्या काय आहे कारण
ANI Twitter Locked
ANI Twitter LockedSaam TV

ANI Twitter Locked : देशातील आघाडीची वृत्तसंस्था एएनआयचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइटने शनिवारी दुपारी अचानक @ANI हँडल ब्लॉक केले.

यानंतर या अकाउंटवर गेल्यावर, हे अकाउंट अस्तित्वात नाही, असं लिहिलेलं दिसत आहे. एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी ट्वीट केले की, ट्विटरने एएनआयचे अकाउंट लॉक केले आहे. (Latest Marathi News)

ANI Twitter Locked
Pm Narendra Modi in Karnataka : 'जेव्हाही काँग्रेसने मला शिवीगाळ केली, तेव्हा जनतेने शिक्षा दिली', कर्नाटकात पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
ANI Twitter Locked
Brij Bhushan Sharan Singh: मी तपासाला सामोरे जाण्यास तयार; FIR दाखल केल्यानंतर ब्रिजभूषण यांची प्रतिक्रिया

प्रकाश यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करत म्हटले आहे की, ट्विटरने अकाउंट तयार करणाऱ्याचे किमान वय १३ वर्षे असण्याचा नियम नमूद केला आहे. त्यांनी ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनाही टॅग केले आहे. पुढच्या ट्विटमध्ये स्मिता यांनी लिहिलं आहे की, 'आम्ही १३ वर्षांपेक्षा कमी वयाचे नाही!'

एएनआयने ट्विटरवर स्वतःचे वर्णन 'भारताची नंबर १ मल्टीमीडिया न्यूज एजन्सी' असे केले आहे. दरम्यान, एएनआय मुख्य ट्विटर अकाउंट लॉक झालं असलं तरी, एएनआय हिंदी, एएनआय डिजिटल, एएनआय एमपी-राजस्थान, एएनआय यूपी-उत्तराखंड इत्यादींचे इतर ट्विटर हँडल चांगले काम करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com