Twitterकडून राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट अनलॉक

राहुल गांधींनी दिल्लीतील नऊ वर्षांच्या बलात्कार पीडितेच्या नातेवाईकांचे छायाचित्र पोस्ट केल्यानंतर ट्विटरने तात्पुरते निलंबित केले. त्यानंतर ते लॉक करण्यात आले.
Twitterकडून राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट  अनलॉक
Twitterकडून राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट अनलॉकSaam tv news

ट्विटरने (Twitter) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे खाते अनलॉक ( केले आहे. राहुल गांधींनी दिल्लीतील नऊ वर्षांच्या बलात्कार पीडितेच्या नातेवाईकांचे छायाचित्र पोस्ट केल्यानंतर ट्विटरने तात्पुरते निलंबित केले. त्यानंतर ते लॉक करण्यात आले. (Twitter unlocks account of Congress leader Rahul Gandhi)

गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांच्या भेटीचा फोटो ट्वीट केला होता. ज्याला भाजपने आक्षेप घेतला. तर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानेही ट्विटर आणि दिल्ली पोलिसांना पत्र पाठवत राहूल गांधीवर कारवाई कऱण्याची मागणी केली होती. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवत त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं निलंबित केलं.

त्याचबरोबर, पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्वीट करत ओळख जाहीर केल्याचे आरोप करत ट्विटरने या संदर्भातील स्पष्टीकरण राहुल गांधीकडे मागितले होते. त्यानंतर कॉंग्रेसने आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्वीट करत ''राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हे तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. राहुल गांधी इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय राहतील." अशी माहिती दिली.

Twitterकडून राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट  अनलॉक
Tokyo Olympics खेळाडूंची राष्ट्रपती भवनात 'चाय पे चर्चा'

दरम्यान, राहुल गांधी यांनी त्यांचे ट्विटर हँडल अनलॉक होण्याच्या एक दिवस आधी एक व्हिडिओ स्टेटमेंट जारी करून ट्विटरवर निशाणा साधला होता. '' एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत आहे, जो लोकशाहीवर हल्ला आहे. हा फक्त माझा आवाज बंद करण्याचा विषय नाही, करोडो लोकांना शांत करण्याचा विषय आहे,'' अशा शब्दांत राहूल गांधी यांनी ट्विटरवर निशानणा साधला होता.

ट्विटरच्या या कारवाईमुळे असे दिसून येते की, ट्विटर हे तटस्थ व्यासपीठ नाही. ट्विटर हे पक्षपाती व्यासपीठ आहे, असे म्हणत देशातील सत्ताधारी सरकार जे म्हणते तेच ट्विटर करते, असा घणाघातही यावेळी राहूल गांधी यांनी केला. विशेष म्हणजे, पिडीत कुटुंबाचा फोटो ट्विटरवर शेअर करण्याबाबत त्यांना काहीच आक्षेप नसल्याचे पिडीतेच्या आईने सांगितले होते.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com