VIDEO: दोन विमानांची हवेतच टक्कर! क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, पाहा व्हिडीओ

शनिवारी अमेरिकेतील डॅलस येथे वर्ल्ड वॉर-2 स्मरणार्थ एअर शोचे आयोजन करण्यात आले होते.
Airplane Accident
Airplane AccidentSaam TV

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एअर शो दरम्यान एक भीषण अपघात झाला. दोन विमानांची हवेतच टक्कर (Plane Crashed) झाल्याने पायलट आणि क्रू मेंबर्ससह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात इतका भीषण होता की, अपघात होताच एका विमानाचे दोन तुकडे झाले, तर दुसरे विमान पूर्णपणे चक्काचूर झाले.

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, शनिवारी अमेरिकेतील डॅलस येथे वर्ल्ड वॉर-2 स्मरणार्थ एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. ते पाहण्यासाठी लांबून लोक येत होते. एअर शो सुरू असताना अचानक बोईंग बी-१७ फ्लाइंग फोर्ट्रेस बॉम्बरची दुसऱ्या बेल पी-६३ किंगकोब्रा फायटरशी समोरासमोर टक्कर झाली. (National News)

Airplane Accident
Crime News : फेसबुक लाईव्हवर ग्रायंडर मशीनने चिरला स्वत:चा गळा; प्रेयसीमुळे घेतला टोकाचा निर्णय

डॅलस एक्झिक्युटिव्ह विमानतळाजवळ हा अपघात झाला. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरवर सांगितले की, आपत्कालीन कर्मचारी अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. अपघातानंतर विमानातील क्रू मेंबर्सची चौकशी करण्यात येत आहे. दोन्ही विमानांमध्ये किती लोक होते हे लगेच स्पष्ट झालेले नाही.

Commissariat Air Force (CAF) चे अध्यक्ष आणि CEO हँक कोट्स म्हणाले की, B-17 मध्ये साधारणपणे चार ते पाच लोकांचा क्रू असतो. कोट्स म्हणाले की P-63 मध्ये फक्त एक पायलट आहे, परंतु अपघाताच्या वेळी विमानात इतर किती लोक होते हे त्यांनी सांगितले नाही.

Airplane Accident
जी 20 समुहाच्या लोगोवरून वाद, काँग्रेसचा आक्षेप; राजनाथ सिंह म्हणाले, "...तर हात कापायचे का?"

सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अनेक लोकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली होती. दोन विमानांची टक्कर आणि त्यानंतर आगीच्या ज्वाळांमध्ये दोन्ही विमाने खाली येताना दिसत आहेत. विमानं खाली पडल्यानंतर एक मोठा स्फोट देखील झाला.

लाइव्ह एरियल व्हिडिओमध्ये, अपघाताच्या ठिकाणी विमानाचा अवशेष दिसत आहेत. FAA आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) या दोघांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com