Boat Accident : आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींची धडक, ७० पेक्षा जास्त जण बेपत्ता

आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीमध्ये सुमारे 120 प्रवासी असणाऱ्या दोन बोटी धडकून भीषण दुर्घटना झाली आहे. यात ७० हुन अधिक जण बेपत्ता झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
Boat Accident : आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींची धडक, ७० पेक्षा जास्त जण बेपत्ता
Boat Accident : आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींची धडक, ७० पेक्षा जास्त जण बेपत्ताANI

जोरहाट : आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीमध्ये सुमारे 120 प्रवासी असणाऱ्या दोन बोटी धडकून भीषण दुर्घटना झाली आहे. यातील एक बोट माजुलीहून नेमातीघाटाकडे जात होती तर दुसरी बोट विरुद्ध दिशेने जात होती. यात ७० हुन अधिक जण बेपत्ता झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील नेमातीघाटाजवळ ही घटना घडली आहे. Two boats carrying approximately 120 passengers collided in the Brahmaputra river in Jorhat

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी या दुःखद घटनेवर दुःख व्यक्त केले आणि त्यांनी गुरुवारी नेमातीघाटला भेट देणार असल्याचे सांगितले.

"नेमाती घाट, जोरहाट जवळ झालेल्या दुःखद बोट अपघातामुळे मी दु: खी आहे. माजुली आणि जोरहाट प्रशासकांना @NDRFHQ आणि SDRF च्या मदतीने त्वरित बचाव मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले. मी उद्या घटनास्थळी भेट देईन." असे त्यांनी ट्विट केले.

या घटनेत काही लोक सुरक्षित पोहून जीव वाचवण्यात यशस्वी झाले आहेत, तर काही प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) बचाव कार्य करत आहेत.

Boat Accident : आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींची धडक, ७० पेक्षा जास्त जण बेपत्ता
माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची प्रकृती खालावली!

आतापर्यंत 50 लोकांना वाचवण्यात आले आहे आणि 70 जण अद्याप बेपत्ता आहेत, असे एनडीआरएफचे उप कमांडंट पी श्रीवास्तव यांनी सांगितले. तर, जोरहाटमधील नेमातीघाट येथे बोट अपघातात एकाच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. बचावकार्य अद्यापही सुरू असल्याचे असे जोरहाटचे एसपी अंकुर जैन यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com