समलिंगी बहिणींमध्ये जडलं प्रेम; घरातून पळून लग्नही केलं, कुटुंबीयांना कळताच...

आंबेडकर नगरमधील बेपत्ता झालेली तरुणी ही दानकौर येथील बेपत्ता झालेल्या तरुणीची मामेबहीण होती
lesbian sisters love story
lesbian sisters love storySaam Tv

दिल्ली: प्रेमाला जात-पात-धर्माच्या मर्यादा नाही, असे म्हटले जाते. मात्र, ग्रेटर नोयडा (Greater Noida) येथील दोन समलैंगिक बहिणींच्या संबंधाने पोलिसांच्या (Police) नाकात दम आणला आहे. दिल्लीतील (Delhi) दोन वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या या तरुणी काही दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाल्या होत्या. दोघींच्याही कुटुंबियांनी तशी तक्रार पोलिसांत दिली होती. विशेष म्हणजे बेपत्ता झालेल्या दोघीही तरुणी आत्ये आणि मामेबहीणी होत्या. जेव्हा पोलिसांनी या तरुणींना शोधून काढलं तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून पोलिसही चक्रावून गेलेत. दोघींनीही घरातून पळून आल्यानंतर लग्न केलं आहे. आता त्यांनी घरी जाण्यास नकार दिला आहे.

lesbian sisters love story
होणाऱ्या पतीला व्हिडिओ कॉल केला, बोलता बोलता महिला कॉन्स्टेबलनं संपवलं जीवन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडातील दानकौर भागातील एका गावातील एक तरुणी २० एप्रिल रोजी बेपत्ता झाली होती. अनेक दिवस घरच्यांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. यानंतर कोतवाली ठाण्यातही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दुसरीकडे त्याच दिवशी दिल्लीतील आंबेडकर नगर पोलीस स्टेशन परिसरातून आणखी एक तरुणी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी आंबेडकरनगर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती.

विशेष बाब म्हणजे, आंबेडकर नगरमधील बेपत्ता झालेली तरुणी ही दानकौर येथील बेपत्ता झालेल्या तरुणीची मामेबहीण होती. दोन्ही बहिणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होताच पोलीस त्यांच्या शोधात होते. अशातच दोनही तरुणी या दिल्लीतील एका परिसरात किरायाने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासादरम्यान पोलिसांना एक तरुणी वधूच्या वेशात दिसली तर दुसरी तरुणी वराच्या वेशात आढळून आली.

lesbian sisters love story
समलिंगी मैत्रिणींमध्ये जडलं प्रेम; लग्नासाठी घरातूनही पळाल्या, पण शेवटी आलं वेगळंच वळण

पोलिसांनी या तरुणींना तुम्ही घरातून का पळून आल्या आहात अशी विचारणा केली असता, तरुणींनी दिलेल्या उत्तराने पोलिसही हादरवून गेलेत. दोघांनीही पोलिसांना सांगितले की, आम्ही बालपणीच्या मैत्रिणी आहोत. एकमेकींना सोडून आम्ही जगू शकत नाही. त्यामुळे आम्ही स्वखुशीने एकमेकांशी लग्न केले आहे. आता आम्हाला एकमेकांसोबत अख्खं आयुष्य घालवायचं आहे.

दरम्यान, पोलिसांनी दोनही तरुणींना पोलीस ठाण्यात आणले. त्याठिकाणी दोघींच्याही कुटुंबियांनी त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोनही तरुणी आपल्या निर्णयावर ठाम होत्या. या सर्व प्रकारामुळे कोतवाली पोलीस ठाण्यात काही काळ वाद निर्माण झाला होता. या घटनेवरून दोन्ही तरुणींचे कुटुंबिय आपापसात भांडतानाही दिसले. त्याच वेळी, दोन्ही मुलींनी स्पष्टपणे सांगितले की आपण प्रौढ आहोत आणि एकमेकांसोबत राहू इच्छितो. अखेर पोलिसांनी दोनही तरुणींची सुरक्षितेसह त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी रवानगी केली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com