
Viral Video: प्रेमात कोणत्याही व्यक्तीला आपल्या प्रियकराकडे दुसऱ्या व्यक्तीने चुकीच्या नजरेने पाहिलेलं आवडतं नाही. अनेक मुलं मुली कॉलेजमध्ये असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडतात. अशात दोन मुलं एकाच मुलीच्या प्रेमात असतील तर मोठी हाणामारी निश्चित असते. असाच प्रकार प्राण्यांध्ये देखील असतो हे सांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही प्रेम कहाणी कोणत्या साध्या प्राण्याची नाही तर चक्क किंग कोब्रा सापाची आहे. (Latest Viral Video)
किंग कोब्रा हा सर्वाधिक विषारी साप आहे. याचे नाव घेताच अनेकांना घाम फुटतो. अशात व्हायरल व्हिडिओमध्ये दोन नर किंग कोब्रा एका मादी कोब्रासाठी जोरदार भांडत आहेत. सुरूवातीला त्याचं भांडण काही काळाचं असेल असं वाटतं मात्र हे दोघे एका मादी कोब्रासाठी तब्बल पाच तास एकमेकांवर तुटून पडले आहेत. त्यांचा हा भांडणाचा व्हिडिओ बराच जुना आहे. मात्र आता पुन्हा एकदा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
किंग कोब्रा हे साप नेहमी एकटे राहतात. त्यांची शिकार देखील ते एकट्यानेच करत असतात. व्हायरल होत असलेला व्हिडिओ भारतातल्याच एका जंगलातला आहे. यात सुरुवातीला एक किंग कोब्रा मादी कोब्राकडे जातो. आपला वंश वाढवण्यासाठी हे दोघे प्रजनन करणार असतात तितक्यात आणखीन एक किंग कोब्रा तिथे पोहचतो. त्याला मादी कोब्राबरोबर आपला वंश पुढे वाढवायचा असतो. यावेळी आधीच्या किंग कोब्राला याचा खुप राग येतो आणि दोघांमध्ये चांगलीच जुंपते.
एकमेकांना हरवण्यासाठी दोघेही खुप मेहनत घेतात. मात्र त्यांतील कोणताही किंग कोब्रा मागे हटण्यासाठी तयार नसतो. अशात त्यांची ही भांडणं राणी कोब्रा थोड्या अंतरावरून पाहत असते. दोघांचे वाद सुरू आहेत तोवर ती तिथेच थांबते. ५ तास हे दोन्ही कोब्रा एकमेकांना हरवण्याचा प्रयत्न करतात. अशात यात शेवटी मध्येच आलेला दुसरा किंग कोब्रा हार मानतो आणि जंगलात निघून जातो. हा व्हिडिओ एका युट्यूब अकाऊंटवर पोस्ट केलेला आहे. सध्या व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून जिंकलेल्या कोब्राचे काही जण कमेंटमध्ये कौतुक करत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.