जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय जवानांनी मोठा कट उधळला

दहशतवाद्यांकडून यावेळी दोन AK47 रायफल, दोन पिस्तुल आणि चार हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.
Indian Army
Indian ArmySaam TV

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या (Indian Army) जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांच्या जवानांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. दोन कुख्यात दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आलं आहे. दहशतवाद्यांकडून यावेळी दोन AK-47 रायफल, दोन पिस्तुल आणि चार हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.

Indian Army
Pune: भाजपाच्या शहर सरचिटणीसाला व्हॉट्सॲप कॉलद्वारे जीवे मारण्याची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये कुपवाडा येथील नियंत्रण रेषेजवळील माछिल परिसरातील टेकरी नार क्षेत्रात ही चकमक झाली. दहशतवाद्यांकडून (Terrorist) जप्त करण्यात आलेल्या हत्यारांवरुन त्यांनी मोठा कट आखल्याचा अंदाज आहे. मात्र भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईमुळे हा कट उधळला गेला आहे. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. तपास यंत्रणा याबाबत अधिक तपास करत आहेत.

कुपवाडाचा परिसर अनेकदा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असतो. दहशतवादी हल्ल्याच्या अनेक घटना कुपवाडा येथे घडल्या आहेत. यावर्षी जून महिन्यात कुपवाडा येथील कंडी परिसरात दहशतवादी आणि पोलीस-सेनेच्या जवानांसोबत चकमक झाली होती. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय जवानांना यश आलं होतं. या दोन दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याची ओळख तुफैल अशी करण्यात आली होती.

Indian Army
नवरात्रोत्सवाच्या आदल्या दिवशीच भाविकांवर काळाचा घाला; ज्योत आणण्यासाठी निघालेल्या दोघांचा जागीच मृत्यू

दहशतवाद्यांनी दोन प्रवाशांचीही केली होती हत्या

काही दिवसापूर्वी दहशतवाद्यांनी दोन प्रवाशांची गोळ्या घालून हत्या केली होती. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामाच्या खरपोरा रत्नीपोरा येथे शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी दोन कामगारांची गोळी मारुन हत्या केली होती. दोघेही बिहारचे रहिवाशी होती. गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी प्रवाशी कामगारांना टार्गेट करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com