
शिवाजी काळे
Delhi News: राजधानी दिल्ली इथं प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली स्पेशल सेलने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणाशी संबंधित दहशतवादी जगजीत सिंह आणि नौशादला अटक केल्यानंतर आता पंजाबमध्ये दहशतवादी कट आखणाऱ्या आणखी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. (Latest Delhi News)
दोन्ही दहशतवादी पंजाबच्या गुरदासपूर इथले रहिवासी आहेत. जगबीर उर्फ जग्गा आणि गुरुप्रीत अशी दोघांची नाव आहेत. दोघंही चुलत भाऊ आहेत. अशी माहिती मिळाली आहे. या दोघांनी या आधी देखील पंजाबमध्ये हल्ला करण्याचा कट रचला होता.
राजकीय नेत्याच्या जीवाला होता धोका!
या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर एक राजनेता होता अशी माहिती देखील समोर येत आहे. या दोघांनाही न्यायालयात हजर केलं असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून दोघांनाही पोलिसांनी गुप्त ठिकाणी ठेवले आहे.
१५ ऑगस्ट २०२२ ला पंजाबमध्ये मोठा घातपात करण्याचा प्लॅन या दहशतवाद्यांनी केला होता मात्र पोलिसांच्या कारवाईने तो प्लॅन फसला. या नंतर पुन्हा एकदा पंजाबमध्ये घातपात करण्याचा कट या दहशतवाद्यांनी आखला होता. त्यांचा हा डाव देखील पोलिसांनी उधळून लावाला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.