Jammu Kashmir News : बडगाममध्ये जोरदार धुमश्चक्री; भारतीय जवानांनी 'लश्कर'च्या २ दहशतवाद्यांना टिपलं

दोन्हीही दहशतवादी अलीकडेच झालेल्या एका चकमकीतून बचावले होते.
Army (File Photo)
Army (File Photo)Saam Tv

Jammu Kashmir Encounter News : जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये मंगळवारी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. एन्काउंटरमध्ये सुरक्षा दलांच्या जवानांनी लश्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, बडगाममधील एसएसपी कार्यालयाजवळ सुरक्षा दलाचे जवान (security forces) आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या ठिकाणी दोन दहशतवादी (Terrorist) लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना (Army Jawan) मिळाली होती. त्यानंतर जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं.

Army (File Photo)
Salary Hike : नोकरदारांसाठी खूशखबर! यावर्षी जबरदस्त पगारवाढ, किती टक्के वाढणार जाणून घ्या!

सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांना आधी घेरले. त्यानंतर शोधमोहीम सुरू केली. दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात दहशतवादी कारवाया सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी बडगाममध्ये मोबाइल वाहन तपासणी चौकी सुरू केली. एका कॅबला थांबवण्याच्या सूचना दिल्या, मात्र, आतमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार (Firing) करण्यास सुरूवात केली. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार केला. (Latest Marathi News)

Army (File Photo)
Narendra Modi : ठरलं! आगामी निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन तयार; नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

चकमकीसंदर्भात माहिती देताना काश्मीरच्या एडीजीपींनी सांगितले की, चकमकीत (Encounter) मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली आहे. पुलवामातील अरबाज आणि शाहीद शेख अशी दोघांची नावे आहेत. बंदी घातलेली दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाशी संबंधित होते. हे दोन्हीही दहशतवादी अलीकडेच झालेल्या एका चकमकीतून बचावले होते.

दोन दिवसांपूर्वीच झाली होती चकमक

याआधी रविवारीही सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. रिपोर्ट्सनुसार, तीन दहशतवाद्यांना जवानांनी घेरले होते. मात्र, त्यावेळी ते तिघेही पसार झाले. बडगाम जिल्ह्याच्या रेडबुग मागाम परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला होता. त्यानंतर त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी दहशतवादी पसार झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com