बापरे ! महिलेच्या शरीरात चक्क कोरोनाच्या दोन व्हेरियंटचा शिरकाव !
बापरे ! महिलेच्या शरीरात चक्क कोरोनाच्या दोन व्हेरियंटचा शिरकाव !Saam Tv

बापरे ! महिलेच्या शरीरात चक्क कोरोनाच्या दोन व्हेरियंटचा शिरकाव !

जगात कोरोनाच्या दुहेरी इन्फेक्शनचे आव्हान उभे राहिले आहे. बेल्जीयम मध्ये मृत झालेल्या वृद्ध महिलेचा शरीरात कोरोनाचे दोन व्हेरिएंट्स नी शिरकाव केला होता. कोरोनाच्या दुहेरी संक्रमनामुळे मृत्यू झाल्याची हि पहिला घटना आहे

विहंग ठाकूर

पॅरिस : जगात कोरोनाच्या दुहेरी  इन्फेक्शनचे आव्हान उभे राहिले आहे. बेल्जीयम मध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या वृद्ध महिलेचा शरीरात कोरोनाचे दोन व्हेरिएंट्स नी शिरकाव केला  होता. कोरोनाच्या दुहेरी संक्रमनामुळे मृत्यू  झाल्याची हि पहिलीच घटना आहे . Two variants of the corona in the woman's body

महिलेला दुहेरी संसर्ग कसा झाला :

करोनाच्या दोन भिन्न वेरिएंटचीएकाच वेळी लागण झालेल्या या ९० वर्षीय महिलेचा मार्च २०२१ मध्ये मृत्यू झाला होता. त्यावेळेस महिलेचे लसीकरण करण्यात आले नव्हते. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेला दोन वेरिएंटची लागण झाली असल्याची डॉक्टरांनी शंका व्यक्त केली होती. युरोपियन काँग्रेसमध्ये 'क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी आणि संसर्गजन्य रोग' या विषयावरील परिषदेत बेल्जियमच्या या कोरोनाबाधित महिलेच्या प्रकरणावरही या वर्षी चर्चा करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

अशा कोरोनाग्रस्तांवर लस किती परिणामकारक ठरेल?

अशा प्रश्नांनी शास्त्रज्ञांना चक्रावून सोडले आहे. ९० वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेला इंग्लंड मध्ये आढळलेल्या अल्फा Alpha आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या बीटा Beta अशा कोरोनाच्या दोन व्हेरियंट चा संसर्ग झाला होता. महिलेला दोन व्यक्ती पासून कोरोनाची लागण झाली असावी. असा संसर्ग दुर्मिळ स्वरूपाचा आहे असे मत डॉक्टर्स, शास्त्रज्ञ यांनी व्यक्त केलं आहे.

बापरे ! महिलेच्या शरीरात चक्क कोरोनाच्या दोन व्हेरियंटचा शिरकाव !
जगन्नाथ रथयात्रा कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर सुरू, राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

याबाबत युरोप काँग्रेस ऑफ क्लीनिकल मायक्रोबायोलाॅजी इंफेशियस डिसीजेस वर्तमानपत्रात डबल इन्फेक्शन संशोधनाचे  निष्कर्ष प्रसिद्ध  झाले आहेत. दोन व्हेरियंट होण्याला को-इन्फेक्शन म्हंटले जाते.

हा संसर्ग कसा झाला त्यावर लस Vaccine किती प्रभावी आहे, याचा अभ्यास  शास्त्रज्ञ  करत आहेत. सर्व व्हेरिएंटवर जगभरातील शास्त्रज्ञ नजर ठेवून आहेत. मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा अल्फा आणि डेल्टा वेरिएंटचा संसर्ग होत आहे. कोरोनाची लस व्हेरिएंटवर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com