
नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिराती म्हणजे युएईचे (UAE) अध्यक्ष शेख खलिफा बिन जायद अल नाहयान (Sheikh Khalifa bin Zayed Al Nahyan) यांचे निधन झाले आहे. ते ७३ वर्षांचे होते. 'डब्लूएएम' या वृत्तसंस्थेने या शेख खलिफा यांच्या निधनाची माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या राष्ट्रपती कार्यलयानेही निधनाची (Death) पुष्टी दिली आहे. शेख खलिफा यांच्या निधनानंतर जगभरातील लोकांनी शोक व्यक्त केला आहे. शेख खलिफा यांच्या निधनानंतर युएईमध्ये चाळीस दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. (UAE president sheikh khalifa passes away)
हे देखील पाहा -
शेख खलिफा हे २०१९ साली चौथ्यांदा पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. युएईच्या सर्वोच्च परिषदेनं त्यांची पुन्हा अध्यक्ष पदासाठी निवड केली होती. शेख खलिफा हे संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष म्हणून ३ नोव्हेंबर २००४ पासून जबाबदारी सांभाळत आहे. शेख खलिफा यांना त्यांच्या वडिलांचे उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शेख खलिफा हे अनेक दिवसांपासून स्ट्रोकच्या आजाराशी झुंज देत होते. त्यामुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. खलीज टाइम्सच्या माहितीनुसार, शेख खलिफा यांच्या निधनानंतर युएईमध्ये राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. युएईमध्ये तब्बल ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या दिवसांमध्ये देशाचा झेंडा अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे.
कोण होते शेख खलिफा ?
शेख खलिफा यांचा जन्म १९४८ साली झाला होता. ते संयुक्त अरब अमिरातीचे दुसरे अध्यक्ष आणि अबु धाबीचे १६ वे शासक होते. शेख खलिफा हे शेख जायद यांचे पुत्र होते. त्यांचे वडील शेख जायद यांचा २००४ साली मृत्यू झाला होता. शेख जायद हे युएईचे संस्थापक होते. जगातला सर्वात उंच टॉवर असलेल्या दुबईतील बूर्ज खलिफाचे नाव देखील हे शेख खलिफा यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे.
Edited By - Vishal Gangurde
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.