लग्नासाठी स्थळ पाठवलं अन् मुलीने केलं 'असं' चॅट! ते पाहून वडीलही संतापले

मॅट्रिमोनिअल साईट वर भेटलेल्या व्यक्तीला एका मुलीने चक्क जॉब ऑफर केला आहे. एवढंच नव्हे तर या व्यक्तीचा बायोडाटा देखील मागवला आणि इंटरव्ह्यूची लिंक देखील पाठवली आहे.
लग्नासाठी स्थळ पाठवलं अन् मुलीने केलं 'असं' चॅट! ते पाहून वडीलही संतापले
Viral ScreenshotTwitter/@i_Udita

Viral News: मॅट्रिमोनिअल साईटवर लोक आपल्या लाईफ पार्टनरच्या शोधात असतात. परंतु येथे एक मुलीने मॅट्रिमोनिअल साईटवर भेटलेल्या व्यक्तीला असं काही केलं की, हे ऐकून सर्वजण चकित झाले आहेत. ट्विटरवर सध्या एक चॅट व्हायरल होत आहे. यामध्ये मुलीने त्या व्यक्तीशी लग्न करण्याऐवजी त्याला चक्क नोकरीची ऑफर दिली. एवढेच नाही तर तरुणीने त्या व्यक्तीचा बायोडाटा मागितला आणि इंटरव्ह्यूची लिंकही पाठवली. (Udita Pal Screenshot)

त्यानंतर, ही गोष्ट जेव्हा मुलीच्या वडिलांना समजली तेव्हा त्यांची यावर प्रतिक्रिया मात्र बघण्यालायक होती. मुलगी आणि तिचे वडील यांच्यात झालेली चॅटिंग ही ट्विटरवर सध्या व्हायरल होत आहे. या चॅटला उदिता पाल (Udita Pal Viral Screenshot) ने शेअर केलं आहे. उदिता बेंगलोरमधील एक स्टार्टअप कंपनीची फाउंडर आहे.

Viral Screenshot
Electric Scooter Fire: तामिळनाडूत पुन्हा इलेक्ट्रिक स्कुटरला आग! थोडक्यात बचावला चालक

झाले असे की, नुकतेच उदिताच्या वडिलांनी तिला लग्नसाठी एका व्यक्तीचा बायोडाटा पाठवला होता. परंतु उदिताला वाटले की, हा बियोडाटा तिच्या कंपनीला कामी येऊ शकतो. अन् मग काय... उदिताने या व्यक्तीला बायोडाटा मागितला आणि ऑनलाईन इंटरव्हियूची लिंक देखील पाठवली.

अन् जेव्हा ही गोष्ट उदिताच्या वडिलांना समजली तेव्हा ते तिच्यावर नाराज झाले. त्यांनी तिला मेसेज केला की, तू मॅट्रिमोनिअल साईटवरून लोकांना कामाला नाही ठेवू शकत. यावर उदिताने त्यांना रिप्लाय सुद्धा केला आहे की, 7 वर्षे फिनटेकचा अनुभव उत्तम आहे आणि आम्ही त्यांना कामावर घेत आहोत. मला माफ करा.

उदिताने आता या संभाषणाचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला आहे. पोस्टला आतापर्यंत 12,000 हून अधिक लाईक्स आणि 1,200 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.