UGC NET 2021: NTA कडून NET परीक्षेची तारीख जाहीर

UGC च्या NET परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
UGC NET 2021: NTA कडून NET परीक्षेची तारीख जाहीर
UGC NET 2021: NTA कडून NET परीक्षेची तारीख जाहीरSaam Tv

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NTA UGC च्या NET परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. कोरोनामुळे Corona डिसेंबर २०२० सत्राच्या परीक्षा आयोजित करण्यात आले आहे. जून २०२१ च्या अर्जाच्या प्रक्रियेत विलंब झाले असल्याने दोन्ही सत्रांची परीक्षा ही एकाच वेळी घेण्यात येत आहे.

ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या UGC NET Exam date परीक्षेकरिता अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर २०२० सत्र परीक्षा आणि जून २०२१ सत्र परीक्षा एकत्र करण्यात आले आहे. आता दोन्ही सत्रांची परीक्षा एकाच वेळी ६ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२१ या काळात होणार आहे.

हे देखील पहा-

इच्छुक उमेदवार हे ugcnet.nta.nic.in आणि nta.ac.in ला भेट देऊन ऑनलाईन Online अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ५ सप्टेंबर २०२१ आहे. फी भरण्याची अंतिम तारीख ही ६ सप्टेंबर २०२१ आहे. उमेदवार ७ सप्टेंबर पासून १२ सप्टेंबर दरम्यान त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा करू शकणार आहेत. या अगोदर डिसेंबर २०२० सत्राची UGC NET परीक्षा ही २ मे ते १७ मे २०२१ च्या दरम्यान होणार होती.

UGC NET 2021: NTA कडून NET परीक्षेची तारीख जाहीर
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास UGC ची परवानगी, राज्य सरकारचा विरोध! पुढे काय होणार?

UGC NET डिसेंबर २०२० साठी अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी- मार्च २०२१ मध्ये आयोजित केली आहे, असे उमेदवार ज्यांनी UGC NET डिसेंबर २०२० परीक्षेकरिता नोंदणी केली आहे. परंतु, अर्ज पूर्णपणे सादर करू शकले नाहीत ते https://ugcnet.nta.nic.in, www.nta.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज पूर्ण करू शकणार आहेत.

६ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान २ शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. १ शिफ्ट ही सकाळी ९ ते दुपारी १२ आणि २ शिफ्ट ही दुपारी ३ ते संध्याकाळी ६ पर्यंत असणार आहे. ही परीक्षा संगणक आधारित CBT पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेमध्ये २ पेपर असणार आहेत. २ पेपरमध्ये मल्टिपल चॉईस प्रश्न राहणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com