मित्राच्या लग्नात नाचणे तरुणाला पडले महागात; नाचताना बेशुद्ध होऊन जमीनीवर पडला अन्...

ujjain news : लग्नाच्या वरातीत एक तरुण नाचत असताना अचानक बेशुद्ध झाला आणि जमीनीवर पडला.
मित्राच्या लग्नात नाचणे तरुणाला पडले महागात; नाचताना बेशुद्ध होऊन जमीनीवर पडला अन्...
ujjain boy dies suddenly while dancing on dj in friend marriage in ujjain Saam tv

उज्जैन : लग्नाच्या वरातीत अनेक जण बेधुंद नाचत असतात. मात्र, एका तरुणाला वरातीत नाचणे महागात पडले आहे. लग्नाच्या वरातीत एक तरुण नाचत असताना अचानक बेशुद्ध झाला आणि जमीनीवर पडला. त्यामुळे उपस्थित लोकांनी त्याला जिल्ह्याच्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. तरुणाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तरुणाच्या मृत्यू (Death) झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (ujjain boy dies suddenly while dancing on dj in friend marriage in ujjain )

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, लालासिंह असे मृत तरुणाचे नाव आहे. केवळ अठरा वर्षाचा असलेला हा तरुण उज्जैनमधील अबोंदिया गावाचा रहिवाशी होता. लालासिंह हा त्याचा मित्र विजयच्या लग्नासाठी ताजपूर येथे गेला होता. मित्राच्या लग्नात लालासिंह बेधुंद होऊन डीजेच्या मागे नाचत होता. केवळ लालासिंह पाणी प्यायला आणि नाचणे सुरू केले, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. वरातीत स्पीकरवर गाणे खूप मोठ्याने वाजवले जात होते. या स्पीकरच्या मागे लालासिंह आणि त्याचे मित्र नाचत होते. मात्र नाचताना अचानक लालासिंह बेशुद्ध होऊन जमीनीवर पडला. त्यानंतर त्याचा मित्र पुराण सिंहने त्याला ताजपूरच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथील डॉक्टरांनी लालासिंहला घेऊन उज्जैनमधील (ujjain) रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मित्रांनी त्याला तातडीने उज्जैनमधील रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी लालासिंहला तपासल्यानंतर मृत घोषित केले.

ujjain boy dies suddenly while dancing on dj in friend marriage in ujjain
धक्कादायक! मध्यप्रदेशात दुमजली इमारतीला भीषण आग; ७ जणांचा जागीच मृत्यू

'हे' असू शकते मृत्यूचे कारण

लालासिंहच्या मृत्यूची खबर कळताच घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. त्यावेळी स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी गजेंद्र पचोरिया यांनी सांगितले की, तरुणाचा लग्नाच्या वरातीत नाचताना मृत्यू झाला. मात्र, या प्रकरणाचा तपास पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे डॉ. जितेंद्र शर्मा यांनी सांगितले की, स्पीकरमधून जास्त डेसिबलचा आवाज हा शरीरासाठी हानिकारक असतो. या आवाजाचा हृदय आणि मेंदू या दोन्ही अवयवांवर परिणाम होतो. या मोठ्या आवाजामुळे लालासिंहचा मृत्यू झाला आहे. आता उन्हाळा ऋतू सुरू आहे. त्यामुळे शरीराच्या फायद्यासाठी द्रव पदार्थाचे सेवन अधिक करायला हवे. यामुळे शरीरात उर्जा टिकून राहते.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.