ब्रिटनचे PM बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा, ४८ तासांत ५० मंत्र्यांनी दिले होते राजीनामे

ब्रिटनमध्ये सत्तासंकट गहिरं झालं असतानाच पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे.
UK Prime Minister Boris Johnson resigns
UK Prime Minister Boris Johnson resignsSaam TV

लंडन: ब्रिटनमध्ये सत्तासंकट गहिरं झालं असतानाच पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. बोरिस जॉन्सन सरकारला (Boris Johnson) एकापाठोपाठ एक धक्के बसले होते. सरकारमधील मंत्र्यांनी बंडाचे निशाण फडकावले होते.

मागील ४८ तासांत ५० मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे पंतप्रधानपदावरून पायउतार होण्यासाठी त्यांच्यावर मोठा दबाव होता. अखेर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही राजीनामा दिल्याचे वृत्त ब्रिटीश माध्यमांनी दिले आहे. (UK Prime Minister Boris Johnson resigns)

ब्रिटनमध्ये (Britain) मागील ४८ तासांत ४० ते ५० मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर ब्रिटनमधील सत्तासंकट गडद झालं होतं. मंत्र्यांच्या राजीनामासत्रामुळं दबावात असलेल्या बोरिस जॉन्सन यांनी अखेर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. ब्रिटीश मीडियानं हे वृत्त दिलं आहे.

बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त ब्रिटनमधील स्काय न्यूजनं दिलं आहे. तर बीबीसी आणि रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, जॉन्सन यांनी पायउतार होण्याची तयारी दर्शवली आहे. ते आज राजीनामा देऊ शकतात.

बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात त्यांच्याच कंझर्व्हेटिव्ह पार्टीमधून बड करण्यात आलं. आतापर्यंत ४० ते ५० मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्यावरही पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला होता. विरोधी लेबर पार्टीनेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

ब्रिटन सरकारमधील अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्या राजीनाम्यानंतर बोरिस जॉन्सन यांची खुर्ची डळमळीत होण्यास सुरुवात झाली होती. त्यांनी ५ जुलै रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही तासांतच आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनीही राजीनामा दिला. आतापर्यंत चार कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामे दिले. त्यात सुनक, जाविद यांच्यासह सायमन हार्ट आणि ब्रँडन लुईस यांचाही समावेश आहे. हे सरकार राष्ट्रहिताची कामे करत नसल्याचा आरोप त्यांच्यात मंत्र्यांनी राजीनामा देताना म्हटलं होतं. आतापर्यंत ४ कॅबिनेट मंत्री, २२ मंत्री आणि २२ खासदारांचे स्वीय सचिव आणि ५ अन्य नेत्यांनी राजीनामे दिले आहेत.

Edited By - Nandkumar Joshi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com