UNGA : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतून पंतप्रधान मोदींचे संबोधन; वाचा सविस्तर

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतुन मोदींनी दहशतवादाविरोधात हुंकार फुंकला असून यावेळी त्यांनी पाकिस्तानला जोरदार इशारा दिला आहे. मोदी म्हणाले, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांनी विचार करावा, दहशतवादाचा फटका त्यांनाही बसू शकतो.
UNGA : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतून पंतप्रधान मोदींचे संबोधन; वाचा सविस्तर
UNGA : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतून पंतप्रधान मोदींचे संबोधन; वाचा सविस्तरtwitter/@ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 76 व्या सत्राला संबोधित करताना अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. २५ मिनिटांच्या या संबोधनात मोदींनी भारताला विकासाचा सर्वंकष आराखडा मांडण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळात देशात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या योजनांची सविस्तर मांडणी त्यांनी या मंचावरून केली. कोरोना व्हायरस (कोविड -19) तसेच दहशतवादाचा मुकाबला करण्याची गरज यासह जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, भारतामधल्या सशक्त लोकशाहीमुळे माझ्यासारखा एक चहा विक्रेत्याचा मुलगा पंतप्रधान होऊन चौथ्यांदा संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलत आहे. गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीचा मुकाबला करत आहे. यावेळी त्यांनी कोरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या जगभरातील सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. भारताने कोरोना काळात आपली जबाबदारी समजून घेऊन शास्त्रज्ञांच्या मदतीने कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. भारताने पहिली DNA Vaccine तयार केली. देशात कोविन ऍपच्या माध्यमातून लसीकरण पूर्ण करण्यात येत आहे. दिवसाला सुमारे ३ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. जगभरात लसींचा पुरवठा भारत करत असून जगातील सर्व लस बनवणाऱ्या कंपन्यांनी भारतात येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

५० कोटी लोकांना मोफत आरोग्यसुविधा :

भारतात गेल्या ७ वर्षात ४३ कोटी पेक्षा जास्त लोकांना बँकिंग क्षेत्राशी जोडण्यात आल्याचे मोदींनी सांगितले. ३६ कोटी लोकांना विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले असून, ५० कोटी लोकांना मोफत आरोग्य सुविधा देण्यात आली, देशातील १७ कोटी नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा केला असल्याचे त्यांनी सांगितले, देशातल्या ३ लाख बेघरांना स्वतःच घर देण्यात आले असून भारतात ३ कोटी पक्की घरे बांधल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानला सज्जड इशारा :

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतुन मोदींनी दहशतवादाविरोधात हुंकार फुंकला असून यावेळी त्यांनी पाकिस्तानला जोरदार इशारा दिला आहे. मोदी म्हणाले, अफगाणिस्तानच्या जमिनिचा वापर दहशतवादासाठी करता काम नये, तेथील नाजूक स्थितीचा फायदा कोणी देश टूल म्हणून घेता कामा नये तेथील अल्पसंख्याक आणि महिला यांना मदत करायला हवी तसेच, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांनी विचार करावा, दहशतवादाचा फटका त्यांनाही बसू शकतो.

चीनवर नाव न घेता टीका :

मोदींनी यावेळी जगाला विस्तारवादावर लगाम घालायला हवा असे आवाहन केले. जगातल्या सर्वच समुद्रांवर सर्वांचा अधिकार असून समुद्र हा आंतरराष्ट्रीय व्यापाराची लाईफलाईन असून मेरीटाईम सुरक्षा महत्वाची असल्याचे ते म्हणाले.

भारतात डिजिटल युगाची सुरुवात :

यावेळी मोदींनी भारत डिजिटल युगाची सुरुवात झाली असून आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून भारताला सर्वांगीणदृष्ट्या सशक्त करण्यात येत असल्याचे सांगितले. भारताला जगातील सर्वात मोठं ग्रीन हब बनवण्याचं काम सुरु असून, भारत हा सर्वात विश्वासू आणि लोकशाहीवादी देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विज्ञानाधिष्टित दृष्टिकोन मजबूत करण्यासाठी, भारतात अनुभव व प्रात्याक्षिकाधारीत शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. शाळांमध्ये हजारो अटल टिंकरिंग लॅब उघडल्या आहेत.

प्रतिगामी विचार आणि अतिरेकीपणाचे धोके वाढत आहेत :

मोदी म्हणाले की, जगात प्रतिगामी विचार आणि अतिरेकीपणाचे धोके वाढत आहेत. "या परिस्थितीत, संपूर्ण जगाला विज्ञान-आधारित, तर्कसंगत आणि पुरोगामी विचार, त्यांच्या विकास कार्यक्रमांचा आधार बनवावा लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com