
नवी दिल्ली : युनियन बँक ऑफ इंडियाच्या (Union Bank Of India) ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. बँकेच्या बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरांमध्ये लवकरच बदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. बँकेच्या (Bank) वेबसाइटनुसार, नवे दर १ जून २०२२ या तारखेपासून लागू होणार आहे. बँकेच्या बचत खात्यातील ५० लाखांपर्यंतच्या रक्कमेवर २.७५ टक्के व्याज मिळणार असून याआधी २.९० टक्के व्याज मिळत होते. (Union Bank of India has changed Interest Rates On Savings Bank deposits )
हे देखील पाहा -
युनियन बँकेच्या बचत खात्याच्या व्याजदरांमध्ये (Interest) लवकरच बदल करण्यात येणार आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून ही माहिती समोर आली आहे. युनियन बँकेत बचत खात्यातील १०० कोटी ते ५०० कोटींच्या रुपयांवर ३.१० व्याज मिळणार आहे. याआधी या रक्कमेवर २.९० टक्के व्याज मिळत होते. तसेच ५०० कोटी ते १००० कोटींच्या बचत खात्यातील रक्कमेवर २.९० टक्केच्या ऐवजी आता ३.४ व्याज मिळणार आहे. १००० कोटींपेक्षा अधिक रक्कमेवर ३.५५ टक्के व्याज मिळणार असून याआधी याच रक्कमेवर २.९० व्याज मिळत होते.
कोटक महिंद्रा बँकेनेही वाढविले व्याज दर
दरम्यान, कोटक महिंद्रा बँकेने (Kotak Mahindra Bank) २ कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या ३९० ते २३ महिन्यांच्या अवधी असलेल्या मुदत ठेवीवर (Fixed Deposit)व्याजदर वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे ६ मे २०२२ रोजीपासून ५.२ टक्क्यांवरून ५.५ टक्के व्याजदर मिळणार आहे. तसेच आरबीआय बँकेने (RBI Bank) रेपो दर वाढविण्याची घोषणा केल्याने बंधन बँक, आयसीआयसीआय बँक, जन स्मॉल फायनान्स बँक आणि फेडरल बँक इत्यादी बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. आगामी काही दिवसांमध्ये काही मुख्य बँकाच्या अल्प रक्कमेच्या बचतीवर देखील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Edited By - Vishal Gangurde
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.