Union budget 2023 : 'या' नियमांच्या बदलामुळे तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, काय आहेत बदल?

फेब्रुवारी महिन्यांपासून बँकेचे कर्ज, डेबिट आणि क्रेडिट कार्डचे सेवा शुल्क देखील वाढविण्यात येणार आहे.
Union budge 2023
Union budge 2023 saam tv

Union budge 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातील घोषणेमुळे त्याचा परिणाम थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. तर दुसरीकडे फेब्रुवारी महिन्यांपासून बँकेचे कर्ज, डेबिट आणि क्रेडिट कार्डचे सेवा शुल्क देखील वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. (Latest Marathi News)

Union budge 2023
Union Budget 2023 : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार? आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता

कॅनरा बँकेचे डेबिट कार्डच्या सेवा शुल्कात वाढ

कॅनेरा बँकेने १३ फेब्रुवारीपासून डेबिड कार्डच्या सेवा शुल्कात वाढ करणार आहे. कॅनरा बँकने क्लासिक डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क १२५ रुपयांहून २०० रुपये केले आहे. तर प्लॅटिनम आणि बिझनेस कार्डचे वार्षिक सेवा शुल्क अनुक्रमे २५० , ३०० रुपये वाढवून ५०० रुपये वाढवली आहे.

बँकेने (Bank) कार्ड बदलण्याच्या लागणाऱ्या शुल्काची रक्कम ५० रुपयांहून १५० रुपये केली आहे. मेसेज अलर्टवर बँक आतापर्यंत तिमाहीत १५ रुपये शुल्क आकारले जात आहेत. मात्र आता हे शुल्क प्रत्यक्ष आकारणीवर असेल.

एचडीएफसी बँकेने केले क्रेडिट कार्डच्या नियमात बदल

एचडीएफसी बँकने त्यांच्या मिलेनिया क्रेडिट कार्डमधून (Credit Card) रिवॉर्ड काढण्याशी संबंधित अटींमध्ये बदल केले आहेत. कार्डधारक आता रिवॉर्ड पॉइंट्ससाठी वस्तूचे मूल्य 70 टक्क्यापर्यंत पूर्तता करू शकतो. त्यानंतर बाकीचे पैसे तो त्याच्या क्रेडिट कार्डने भरू शकतो. बँकेच्या या नव्या अटी १ फेब्रुवारीपासून लागू होतील.

Union budge 2023
Union Budget 2023 : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, आज आर्थिक पाहणी अहवालही सादर होणार

म्युच्युअल फंडच्या नियमात नवे बदल

इक्यिटी म्युच्युअल फंडच्या योजनेतून आता गुंतवणूक काढताना एक दिवस तुम्हाला झटपट पैसे मिळतील. म्युच्युअल फंड (Fund) हाऊस १ फेब्रुवारीपासून पैसे काढण्यासाठी T+२ सायकल स्वीकारणार आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाने २७ जानेवारी रोजी ही माहिती दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com