इंटरनेटचा स्पीड दहा पटीने वाढणार! देशात 5G सुरू होणार; कॅबिनेटने दिली मंजुरी

जुलै महिन्याच्या अखेरीस 5G चा लिलाव होणार आहे.
5G Spectrum Auction
5G Spectrum AuctionSaam Tv

नवी दिल्ली : देशातील इंटरनेटचा (Internet) स्पीड आता दहा पटीने वाढणार आहे. 5G स्पेक्ट्रमचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री मंडळापुढे दूरसंचार विभागाने ठेवला होता. या प्रस्तावाला आता मंजूरी देण्यात आली आहे. सध्या देशातील इंटरनेट ४G स्पीडने सुरू आहे, आता 5G मध्ये इंटरनेटचे स्पीड दहा पटीने वाढणार आहे.

केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत 5G स्पेक्ट्रमच्या लिलाव प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव दूरसंचार विभागाने सादर केला होता. लिलाव जिंकणाऱ्यांना स्पेक्ट्रमचा दिला जाणार आहे, त्यामुळे देशातील इंटरनेटचा (Internet) स्पीड आता दहा पटीने वाढणार आहे. २० वर्षांच्या वैधतेच्या कालावधीसह एकूण ७२०९७.८५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा जुलै २०२२ च्या शेवटला लिलाव केला जाईल, अशी माहिती मिळत आहे.

5G Spectrum Auction
रिसॉर्टला पैसे आले कुठून याचा हिशोब द्यावा लागणार: किरीट सोमय्या

या लिलावात देशातील तीन प्रमुख दूरसंचार कंपन्या सहभागी होण्याची शक्यता आहे. यात व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल लिमिटेड आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची ​​जिओ, या सहभागी होणार आहेत. हा लिलाव कमी, मध्यम आणि उच्च वारंवारता बँडमध्ये होणार आहे. 600 MHz, 700 MHz, 800 MHz असतील. 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz असतील. मिडमध्ये 3300 MHz आणि उच्च 26 GHz वारंवारता बँड आहेत.

5G Spectrum Auction
मोठी बातमी! अनिल परब ईडी चौकशीला गैरहजर?; हे कारण आलं समोर

देशात लवकरच सुरू होणार्‍या 5G सेवा, 4G पेक्षा सुमारे दहा पटीने वेगवान असणार आहे. "स्पेक्ट्रम हा संपूर्ण 5G इको-सिस्टमचा अविभाज्य आणि आवश्यक भाग आहे. 5G सेवांमध्ये नवीन युगाचे व्यवसाय निर्माण करण्याची, उपक्रमांसाठी अतिरिक्त महसूल निर्माण करण्याची क्षमता आहे. (5G latest News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com