Heatwave: पारा वाढला, केंद्राचं टेन्शन वाढलं; सर्व राज्यांना दिला 'हा' इशारा

पुढील तीन ते चार दिवस देशभरात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Heatwave: पारा वाढला, केंद्राचं टेन्शन वाढलं; सर्व राज्यांना दिला 'हा' इशारा
rising temperature and heatwaveSAAM TV

नवी दिल्ली: वाढते तापमान आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा या पार्श्वभूमीवर केंद्राचा 'ताप' वाढला आहे. खबरदारी म्हणून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशभरातील वाढते तापमान आणि उष्णतेची लाट यामुळे आजार वाढण्याची भीती असून, सर्व जिल्ह्यांनी राष्ट्रीय कार्य योजनेंतर्गत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्याच्या सूचना केल्या आहेत.

rising temperature and heatwave
सावधान ! या शहरात पुन्हा वाढू लागली कोरोनाची संख्या, 31 मे पर्यंत कलम 144 लागू

देशभरात वाढते तापमान आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सावधानता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधे आणि ती किती प्रमाणात उपलब्ध आहेत, याबाबतचा आढावा घेण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर संवेदनशील क्षेत्रांमध्ये पुरेसे पिण्याचे पाणी पुरवण्यात येईल, हे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना शनिवारी पत्र लिहिले आहे. सर्व जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेमुळे संभाव्य साथरोगांवर राष्ट्रीय कार्य योजनेसंबंधी मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पत्रानुसार, १ मार्चपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकीकृत साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संबंधित आजारांवर निगराणी ठेवली जात आहे. त्यासंबंधीचा अहवाल राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्रांना पाठवण्यात येत असल्याचे सुनिश्चित करण्यात यावे, असेही या पत्रात म्हटले आहे.

rising temperature and heatwave
उन्हाचा कहर; उष्माघातामुळे १३ दिवसांत पाच जणांचा मृत्यू

आगामी ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

भारतीय हवामान विभाग आणि एनसीडीसीद्वारे सर्व राज्यांना लिहिलेल्या पत्रात पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागांनी आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक पातळीवर स्वयंसेवकांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, अशी सूचना करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.