Ramdas Athawale News: 'मनोज जरांगे पाटील यांची मागणी रास्त'; मराठा आरक्षणावर रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?

Ramdas Athawale News: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीवर भाष्य केलं.
Ramdas Athawale News
Ramdas Athawale NewsSaam tv

Ramdas Athawale On Maratha Reservation:

जालन्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या काही दिवसांपासून उपोषण सुरू आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळं राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. जरांगे पाटील यांची काल सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मात्र, शिष्टमंडळाच्या भेटीनंतरही मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. यानंतर आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीवर भाष्य केलं. (Latest Marathi News)

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. या ठिकाणी जाऊन केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय मंत्री आठवले हे सध्या दिल्लीमध्ये आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Ramdas Athawale News
Maratha Andolan: 'आरक्षणासाठी पुरावे देतो आजच भेटायला या', मनोज जरांगे यांचं सरकारला आवाहन

मराठा आरक्षणावर भाष्य करताना आठवले म्हणाले, ' मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत, त्यांची मागणी रास्त आहे. मराठा समाजात मागासलेली कुटुंब आहेत. त्यांना आरक्षण द्यावं. ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, असं त्यांचं मत आहे. मात्र, ओबीसी आरक्षणात वाढ करून त्यांना त्यात टाकता येत का हे बघावं. वेगळा विचार होतो का हेही पाहावं. राज्य सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक आहे'.

'मी आज रात्री जरांगे पाटील यांना भेटून पाठिंबा जाहीर करणार आहे. माझ्या पक्षाची मागणी आहे की जातीनिहाय जनगणना केली तर सगळ्या जातींचा टक्का समजेल आणि त्यांचा-त्यांचा वाटा त्यांना मिळेल. केंद्र सरकारने त्याचा विचार करावा. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली होती, असे ते म्हणाले.

Ramdas Athawale News
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन? आरक्षणप्रश्नी मंत्रिमंडळाची बैठक सुरु...

इंडिया विरुद्ध भारत वादावर भाष्य करतान आठवले म्हणाले, ' आम्ही सगळे भारतीय आहोत, त्याचा आम्हाला अभिमान आहे. भारतीय नाव हे ओरिजनल आहे. INDIA हे इंग्रजी नाव आहे. त्याला विरोधकांनी विरोध करणे चुकीचे आहे'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com