...तर छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत जाण्याची शक्यता : रामदास आठवले

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच अनेक माध्यमातून संभाजीराजेंनी मोर्चेबांधणी देखील सुरू केली आहे.
Ramdas Athawale
Ramdas Athawale Saam Tv

डोंबिवली : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच अनेक माध्यमातून संभाजीराजेंनी मोर्चेबांधणी देखील सुरू केली आहे.राज्यसभेच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारणात बदलाचे वारे वाहताना दिसून येत आहे. संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षांनी मदत करावी, अशी विनंतीही केली होती. संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) तशा आशयाचं खुलं पत्रही लिहिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही संभाजीराजेंविषयी भूमिका जाहीर केली आहे. शिवसेना (Shivsena) राज्यसभा देत असेल तर ते त्या पक्षात जाऊ शकतात, अशी शक्यता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale ) यांनी वर्तवली आहे. ( union minister ramdas athawale says Sambhaji Raje can join Shiv Sena )

हे देखील पाहा -

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची घौडदौड सुरू केली आहे. या निवडणुकीत जिंकण्यासाठी विधानसभा सदस्यांच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. त्यात छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याची घोषणा केली आहे. संभाजीराजेंनी मतांसाठी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची विनंती केली आहे. राज्यसभेवर अपक्ष म्हणून संधी द्यावी, असे आवाहन राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना केले आहे. राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभा निवडणुकीची भूमिका जाहीर केली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमुळे संभाजीराजेंसमोर मोठा राजकीय पेच उभा राहिला आहे. या स्थितीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आठवले म्हणाले, 'संभाजी राजेंनी शिवसेनेमध्ये जाऊ नये. त्यांना सहा वर्षासाठी भाजपने राज्य सभा दिली होती. त्यांनी भाजपमध्ये राहिलं पाहिजे, असा सल्ला आठवलेंनी दिला. पुढे आठवले म्हणाले, ' संभाजीराजेंना कोणत्या पक्षात जायचं असेल, तर त्यांना तो अधिकार आहे. पण त्यांना शिवसेना राज्यसभा देत असेल तर ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही'. आठवले यांच्या या प्रतिक्रियेमळं राज्यात चर्चेला उधाण आले आहे.

आठवलेंकडून खदानीत बुडून मृत्यू पावलेल्या कुटुंबाचं सांत्वन

दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज डोंबिवलीत संदप गावात खदानीत बुडून मृत्यू पावलेल्या पाच जणांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी देसलेपाडा परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी गायकवाड कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच कुटुंबीयाला ५० हजार देण्याचे आश्वासनही दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com