ट्रेनच्या इंजिनमध्ये अडकून फरफटत गेला तरूण, लोकोपायलटनं ब्रेक लावला नाही, कारण...

ट्रेनच्या इंजिनमध्ये अडकून फरफटत गेला तरूण,  लोकोपायलटनं ब्रेक लावला नाही, कारण...
Expressgoogle

झारखंड : येथील लातेहारमध्ये एक विचित्र अपघाताची (Railway Accident) घटना समोर आलीय. भरधाव वेगाने जाणाऱ्या पलामू एक्स्प्रेसची छिपादोहर आणि कुमेंडी स्थानकादरम्यान एका अज्ञात तरुणाला धडक लागली. त्यानंतर त्या तरुणाचा मृतदेह (dead body stuck ) एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये अडकला. धक्कादायक म्हणजे एक्स्प्रेसच्या लोकोपायलटने ब्रेक न लावल्याने तो तरुण लातेहार स्थानकापर्यंत (Latehar railway station) फरफटत गेला. या गंभीर घटनेमुळं अर्धा तास रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Express
तुम्ही कधी फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाही; भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल

इंजिनमध्ये लटकला इसमाचा मृतदेह

एक्स्प्रेसच्या गार्डने दिलेल्या माहितीनुसार, झारखंडच्या लातेहार रेल्वे स्थानकात पलामू एक्स्प्रेसमध्ये एका तरुणाचा मृतदेह अडकल्याची घटना घडली. पलामू एक्स्प्रेस निर्धारित वेळेनुसार बारवाडी रेल्वे स्थानकावरुन लातेहार स्थानकाकडे रवाना झाली होती. छिपादोहर आणि कुमेंडी स्थानकादरम्यानचा प्रवास करताना एक्स्प्रेस वेगाने धावत असते. त्यावेळी एक इसम एक्स्प्रेसच्या मध्ये आल्याने त्याचा अपघात झाला. एक्स्प्रेस भरधाव वेगानं जात होती त्यामुळे अचानक ब्रेक लावून ट्रेनला थांबवणं शक्य नव्हतं. त्यामुळे लातेहार स्थानकात पलामू एक्स्प्रेसला थांबण्यात आलं. त्यानंतर रेल्वे पोलिसांच्या मदतीनं तरुणाचा मृतदेह काढण्यात आला. या गंभीर घटनेमुळं रेल्वेसेवा अर्धातास ठप्प झाली होती.

भरभाव एक्स्प्रेसच्या धडकेत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

यापूर्वीही रेल्वे अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भरधाव वेगानं जाणाऱ्या एक्स्प्रेसच्या धडकेत दुमका जिल्ह्यातील एका ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला होता. भागलपुर एक्स्प्रेस वेगानं जात असताना एक ट्रॅक्टर रेल्वे रुळ क्रॉस करत असताना हा दुर्देवी अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. मोबाईल फोनवर इयरफोनद्वारे गाणं ऐकत असताना ही घटना घडली. अशी माहिती समोर आली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.