UP: तंदुरी रोटीवर थुंकून स्वयंपाक केल्याचा किळसवाणा प्रकार, Video व्हायरल!

थुंकून रोटी बनवण्याचा आणखी एक व्हिडिओ उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) व्हायरल झाला आहे. मेरठनंतर (Meruth) आता राजधानी लखनऊमध्ये (Lucknow) थुंकून रोटी बनवण्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Viral Video
Viral VideoTwitter/@WalterAdeeb

लखनौ: थुंकून रोटी बनवण्याचा आणखी एक व्हिडिओ उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) व्हायरल झाला आहे. मेरठनंतर (Meruth) आता राजधानी लखनऊमध्ये (Lucknow) थुंकून रोटी बनवण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये धाब्यावर एक व्यक्ती थुंकून तंदूरमध्ये रोटी बनवताना दिसत आहे. त्या व्यक्तीचे हे किळसवाणे कृत्य कोणीतरी कॅमेऱ्यात कैद करून सध्या व्हायरल केले. मोबाईलवरून रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये थुंकून रोटी कशी बनवली जात आहे, हे दिसत आहे. मात्र, आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.

Viral Video
लातुर: 10 वी आणि 12 वीचे वर्ग भरणार; अन्य वर्ग ऑनलाईन सुरू

वास्तविक, थुंकून रोटी बनवण्याचा हा व्हिडिओ काकोरी येथील इमाम अली हॉटेलमधील आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तंदूरमध्ये थुंकताना आणि रोटी शिजवताना दिसत आहे. या व्हिडिओवरून व्हायरल झाला त्यानंतर, पोलिसांनी कारवाई केली असून काकोरी पोलिसांनी हॉटेल मालक याकुब आणि त्याच्या चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. सध्या या व्हायरल व्हिडीओप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

पहा व्हिडीओ-

व्हिडिओमध्ये काय आहे ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक माणूस रोटी शिजवताना दिसत आहे आणि त्याच्या शेजारी आणखी दोन तरुणही आहेत. या दरम्यान, व्यक्ती रोटीमध्ये थुंकते आणि नंतर तंदूरमध्ये शिजवण्यासाठी ठेवते. हा व्हिडीओ दुरूनच कोणीतरी गुपचूप कॅमेऱ्यात कैद केला आहे. त्यामुळे सर्व फारसा स्पष्ट दिसून येत नाही, तरी रोटीमध्ये त्याने थुंकला आहे, हे नक्की आहे.

याआधी उत्तर प्रदेशमध्येच मेरठमध्ये सगाई समारंभात थुंकून रोटी बनवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मेरठमधील कंकरखेडा पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या सगाई समारंभात तंदूर कारागीर नौशाद थुंकून रोटी बनवताना दिसला होता. या घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली होती. याआधीही असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com