UP Elections 2022: 'जिन्ना पर गन्ना भारी पड गया?' पश्चीम यूपीत कुणाचा जोर?...

UP Elections 2022: अखिलेश यादवांचा समाजवादी पक्ष आणि जयंत चौधरींचा राष्ट्रीय लोकदल या पक्षाची युती आहे. त्यामुळे एकाचवेळी जाट, मुस्लिम आणि दलितांचं समीकरण साधला जातोय.
UP Elections 2022: who is the powerful in western uttar pradesh
UP Elections 2022: who is the powerful in western uttar pradeshSaam TV

मुजफ्फरनगर, (उत्तर प्रदेश): देशातील पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय. केंद्राच्या सत्तेचा रस्ता ज्या राज्यातून जातो त्या उत्तर प्रदेशातील सत्ता समीकरणं किचकट आहेत. उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) सत्ताधारी भाजपसाठी (BJP) सर्वात आव्हानात्मक भाग आहे पश्चिम युपी (West UP). जिथे पहिल्या टप्प्यातील निवडणुका (UP Elections 2022) होतायेत. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) सहभागी झालेला हा भाग आहे. तसेच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथली जातीय समीकरणं. इथे जाट आणि मुस्लिम समाजाची संख्या अधिक आहे. (up election 2022 who is the powerful in western uttar pradesh)

हे देखील पहा -

पश्चिम युपी हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा (Sugarcane farmers) बेल्ट आहे. इथं ऊसाचे खासगी कारखाने आहेत. ज्याप्रमाणे आपल्याकडे शेतकरी शेतमाल बाजारात घेऊन जातो. तसा इथे शेतकरी स्वतः ऊस कारखान्यात घेऊन जातो. कारखान्यांकडे शेतकऱ्यांची करोडो रुपयांची बिलं थकीत आहेत. शेतीसंबंधित विजेचा मुद्दाही इथे गंभीर आहे. सर्वाधिक महाग वीज उत्तरप्रदेशमध्ये आहे.

या भागातील दुसरा मुद्दा म्हणजे जातीय समीकरणांचा. इथे अखिलेश यादवांचा (Akhilesh Yadav) समाजवादी पक्ष आणि जयंत चौधरींचा (Jayant Chaudhary) राष्ट्रीय लोकदल या पक्षाची युती आहे. त्यामुळे एकाचवेळी जाट, मुस्लिम (Muslim) आणि दलितांचं (Dalits) समीकरण साधला जातोय. मतदारसंघात फिरतानासुद्धा या पक्षांकडे लोकांचा कल असल्याचा अनुभव येतो. भाजपने या भागात धार्मिक, तसंच धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. मात्र त्याला अपयश आलं. नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सभांमधील भाषणांमधून हे दिसून येतं.

UP Elections 2022: who is the powerful in western uttar pradesh
Hijab Controversy: "बिकीनी घालून कुणी शाळेत जातं का?" प्रियंका गांधींच्या 'त्या' ट्विटनंतर Bikini ट्रेंड आणि प्रियंका ट्रोल...

भाजपने प्रयत्न करुनही त्यांना धार्मिक ध्रुवीकरण करण्यात अपयश आलेलं पाहायला मिळालं. शेतकरी आंदोलनामुळे इथे जाट आणि मुस्लिम एकत्र आले आहेत. एकूणच काय तर, शेती आंदोलनामुळे धार्मिक ध्रुवीकरणाला शेतीच्या मुद्द्यांनी मागे टाकलं. मतदारसंघांमध्ये फिरल्यावर लक्षात येतं की, 'जिन्ना पर गन्ना भारी पड गया'. पण मतपेटीत काय पडेल, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com