UP Politics | असदुद्दीन ओवैसी भाजपाचे चाचाजान; राकेश टिकैत यांची बोचरी टीका

राकेश टीकैत म्हणाले की, “भाजपाचे ‘चाचाजान’ ओवैसी आता उत्तर प्रदेशात आले आहेत. तेच भाजपाला विजयाकडे घेऊन जातील.
UP Politics | असदुद्दीन ओवैसी भाजपाचे चाचाजान; राकेश टिकैत यांची बोचरी टीका
UP Politics | असदुद्दीन ओवैसी भाजपाचे चाचाजान; राकेश टिकैत यांची बोचरी टीकाSaam Tv News

लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्याआधीच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राष्ट्रीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकैत हे उत्तर प्रदेशातल्या बागपतमधील टटीरी या गावात शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करत असताना त्यांनी एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना चक्क भाजपचे चाचाजान अशी उपमा दिली आहे. (UP Politics | Asaduddin Owaisi BJP's uncle; Rakesh Tikait's harsh criticism)

हे देखील पहा -

राकेश टीकैत म्हणाले की, “भाजपाचे ‘चाचाजान’ ओवैसी आता उत्तर प्रदेशात आले आहेत. तेच भाजपाला विजयाकडे घेऊन जातील. आता काहीच अडचण नाही”, त्यामुळे, त्यांनी (ओवैसींनी) त्यांच्यावर (भाजपवर) अत्यंत कठोर शब्दांत जरी टीका केली तरीही त्यांच्यावर (ओवैसींवर) कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही. कारण, ते दोघेही एकच टीम आहेत”, अशी बोचरी टीका करत त्यांनी ओवैसींवर चक्क भाजपची बी टीम असल्यातचा आरोप केला आहे.

UP Politics | असदुद्दीन ओवैसी भाजपाचे चाचाजान; राकेश टिकैत यांची बोचरी टीका
क्रुरतेचा कळस! रजनीकांतच्या फिल्मच्या पोस्टरवर चाहत्यांनी चक्क शिंपडले बकरीचे रक्त!

दरम्यान पुढील वर्षी देशात २०२२ मध्ये उत्तर प्रदेशसह आणखी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात गोवा,पंजाब, उत्तराखंड आणि आणि मनीपुर या राज्यांचा समावेश आहे. ओवैसींचा पक्ष हा एकुण १०० जागा उत्तर प्रदेशात लढवणार आहे. मुस्लीम आणि इतर अल्पसंख्यांकांची मते जास्तीत जास्त मिळवण्यासाठी ओवैसी प्रयत्न करणार आहे. या निवडणुकांना काही महिनेच शिल्लक असताना सर्वच पक्ष निवडणकींच्या तयारीला लागले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com