
नवी दिल्ली : यूपीएससी (UPSC) सिव्हिल सर्व्हिस भरतीची मुख्य परीक्षा 07 ते 16 जानेवारी दरम्यान होणार आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. याच याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असे सांगून न्यायालयाने परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका फेटाळून लावलीये (UPSC Civil Services 2022 Delhi High Court Dismisses Plea Filed To Postpone Mains Exam).
यूपीएससीकडून वकील कौशिक यांनी या याचिकेला विरोध केला आहे. ते म्हणाले, "डेल्टाच्या काळातही सार्वजनिक यंत्रणा गतिमान ठेवणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती. याआधीही सुप्रीम कोर्टाने अशीच याचिका फेटाळून लावली होती. हम 3 वर्षांपासून या रोगाशी लढा देत आहोत. आम्हाला वेळापत्रकानुसार काम कारवे लागेल. आम्ही आधीच गमावलेला वेळ भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत."
ते पुढे म्हणाले, "यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये होणार होती, आम्ही ती जानेवारीमध्ये आयोजित करत आहोत. आणखी उशीर झाल्यास यूपीएससी घटनेने नेमून दिलेली कामे हाताळू शकणार नाही. घरी बसलेल्या लोकांनाही संसर्ग होतो आहे. कारण, हा विषाणू अतिशय संसर्गजन्य आहे. अशा परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलणे योग्य होणार नाही."
याचिकाकर्त्यांचे वकील अनुश्री कपाडिया काय म्हणाल्या?
"परीक्षा देताना उमेदवारांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. तो सामाजिक अंतर न ठेवता 6 तास इतर 30 लोकांसोबत एका खोलीत बसतील. यूपीएससीच्या प्रेस रिलीझमध्ये परीक्षेसाठी एसआयपीचा उल्लेख नाही. यूपीएससीला याची जाणीव आहे की उमेदवारांमध्ये लक्षणे दिसू शकतात आणि त्यांनी अशा उमेदवारांसाठी दोन अतिरिक्त खोल्या बाजूला ठेवल्या आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची परिस्थिती उद्भवू शकते, परंतु अशाही परिस्थितीत त्याला परीक्षा द्यावी लागेल", असं याचिकाकर्त्यांचे वकील अनुश्री कपाडिया यांनी सांगितलं.
"अनेक सील आणि कंटेनमेंट झोन आहेत. मला मुंबईतील एका उमेदवाराचा कॉल आला की त्याची इमारत कोव्हिडमुळे सील करण्यात आली आहे. त्याला कोव्हिड आहे किंवा नाही, पण त्याच्या कोणताही दोष नसताना तो परीक्षेला जाऊ शकणार नाही", अशीही माहिती कपाडिया यांनी दिल्ली हायकोर्टात दिली.
"आता वेळ घालवल्यास मोठा परिणाम होईल"
"आम्हाला आधीच उशीर झाला आहे. आमचा मौल्यवान वेळ वाया गेला आहे. आता वेळ घालवल्यास मोठा परिणाम होईल. उद्यापासून परीक्षा सुरू होत असून त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे", असं UPSC तर्फे हजर झालेल्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला सांगितले.
परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार
याचिका फेटाळल्यानंतर आता परीक्षा निश्चित वेळापत्रकानुसार होणार आहे. उमेदवार 07 जानेवारीपासून लेखी परीक्षेला बसतील. प्रिलिममध्ये 9 लाख उमेदवारांनी भाग घेतला होता, त्यापैकी आता 9 हजार उमेदवार 70 परीक्षा केंद्रांवर मुख्य परीक्षेला बसतील.
Edited By - Nupur Uppal
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.