
UPSC IAS Result 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षेचा (UPSC CSE 2022) अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत (Upsc result 2022) इशिता किशोरने पहिला क्रमांक पटकावला आहे.
दुसऱ्या क्रमांकावर गरिमा लोहिया आणि तिसऱ्या क्रमांकावर उमा हरती एन, चौथा क्रमांक मयूर हजारिका आणि पाचवा रत्न नव्या जेम्सने मिळविला आहे. आयएएस (IAS) परीक्षेत बसलेले उमेदवार यूपीएससीच्या (UPSC) अधिकृत वेबसाइट www.upsc.gov.in वर भेट देऊन पाहू शकतात.
निकालात एकूण 933 उमेदवारांची नियुक्तीसाठी निवड झाली आहे. यापैकी 345 उमेदवार ओपन कॅटगरी, 99 एडब्ल्यूएस, 263 ओबीसी, 154 एसी आणि 72 एसटी प्रवर्गातील आहेत. 178 उमेदवारांची राखीव यादीही तयार करण्यात आली आहे. यातच आयएएस (IAS) पदांवर निवडीसाठी 180 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
UPSC Civil Services Exam Result 2022: यूपीएससी निकालात मुलींची बाजी
यंदा नागरी सेवा परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. अव्वल 4 स्थानांवर मुली आहेत. टॉपर्सची संपूर्ण यादी अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या निकाल नोटिसमध्ये तपासली जाऊ शकते.
UPSC Civil Services Exam Result: 2529 उमेदवारांनी दिली होती मुलाखत
सुमारे 15 दिवसानंतर उमेदवारांचे गुण जाहीर केले जातील. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखती 18 एप्रिलपर्यंत चालल्या होत्या. 30 जानेवारीपासून मुलाखतीची फेरी सुरू झाली होती.
मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या सुमारे 2,529 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. नागरी सेवा परीक्षा 2022 अंतर्गत, यूपीएससीने आयएएस आणि आयपीएस सेवांमध्ये 1011 पदांची भरती काढण्यात आली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.